आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माझी नक्कल नकाे, प्रपंच करा, त्याग करायलाही शिका’: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देश, गाव समाजासाठी लग्न केले नाही. सर्व आयुष्य बलाढ्यांशी टक्कर देण्यात घालवले. त्यामुळेच भ्रष्ट मंत्री सुमारे ४०० अधिकारी घरी गेले. तुम्ही मात्र माझी नक्कल करू नका. माझ्याप्रमाणे अविवाहित राहता प्रपंच करा. परंतु लहान प्रपंचात पडू नका, मोठा प्रपंच करा, देशसेवा, समाजसेवा हाच आपला मोठा प्रपंच समजा, त्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. प्रपंचाबरोबर त्याग करायलाही शिका, असे अावाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी तरुणांना केले. 


पोलिस प्रशासनाच्या वतीने न्यू आर्टस् महाविद्यालयात आयोजित पोलिस पाल्य पारधी समाजाच्या मुला-मुलींच्या नोकरी मेळाव्यात ते बोलत होते. अण्णा म्हणाले, प्रत्येकजण रिकाम्या हातानेच जन्माला आला, अन् रिकाम्या हाताचेच मरणार आहे, तरी सध्या सगळीकडेच स्पर्धा लागल्याचे दिसून येते. माझं... माझं... माझं, माझं ते माझं... अन् तुझं ते माझं असे म्हणत प्रत्येकजण पळत सुटला आहे. मरणानंतर रिकाम्या हातानेच जावे लागणार, हे माहिती असूनही प्रत्येकजण पळताना थांबायला तयार नाही. सरकारने मला लाखो- करोडो रुपयांची बक्षिसे दिली. मी मात्र या सर्व रक्कमा ट्रस्टमध्ये टाकल्या. महिन्याला बारा-तेरा लाख रुपयांचे व्याज येते, ते मी गोरगरीब, गरजूंसाठी वापरतो. माझ्याकडे शेतीवाडी सर्व काही होते, परंतु त्याचा त्याग करत मी देशासाठी जीवन अर्पण केले. सध्या माझ्याकडे केवळ एक बिस्तर ताट आहे. त्यात मला जो आनंद मिळतो, तो एखाद्या करोडपतीला देखील मिळणार नाही. अॅटॅक येऊन मरण्यापेक्षा गाव, समाज देशसेवा करून मरण आले, तर हे मोठे भाग्य आहे, अशा शब्दांत अण्णांनी तरुणांशी संवाद साधला. आपल्यासाठी लाखो लोक हसत हसत फासावर गेले, त्यांची आठवण आपण सर्वांनी ठेवली पाहीजे. या सर्वांची आठवण मी माझ्या हृदयाशी ठेवली असल्याचे अण्णांनी उपस्थितीत तरुणांना सांगितले. 


पारधी पुढे आणि पोलिस मागे असेच चित्र आतापर्यंत आम्ही पाहिले. परंतु पोलिस अधीक्षक शर्मा यांनी पारधी समाजाच्या मुलांसाठी रोजगार मेळावा घेतला, ही कौतुकाची बाब आहे. एक पाऊल तुम्ही टाका, दोन पाऊल आम्ही टाकतो, या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन प्रा. चव्हाण यांनी दिले.

 
दारु पिऊन पहिलवान होता येते का? 
दारु पिऊन पहिलवान होता येते का, असे एखादे उदाहरण दाखवा. आजकालची पोरं सिगारेट पिऊन गोल... गोल धूर सोडतात. काहीही खातात, पितात अन् निघून जातात. खाऊन- पिऊन जगण्यासाठी हे जीवन आहे का, असा सवालही अण्णांनी उपस्थित केला. 

बातम्या आणखी आहेत...