आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंगणापुरात पाच लाख भाविकांनी घेतले शनिदर्शन; रस्त्यावर भाविकांचा दुपारपर्यंत महापूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासेफाटा/सोनई- शनि अमावास्येनिमित्त शनिवारी शनिशिंगणापुरात सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्री १२ वाजता शनिदेवाची महाआरती महापूजा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आॅस्ट्रेलियातील शनिभक्त राकेशकुमार यांच्या हस्ते, तर शनिवारी पहाटेची महाआरती झिम्बाब्वेतील शनिभक्त जयेश शहा, खासदार चंद्रकांत खैरे, डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. 


शुक्रवारी रात्री दहा वाजेपासूनच भाविकांची शिंगणापुरात गर्दी होऊ लागली. शनिवारी दिवसभरात, तर गर्दीने उच्चांक केला. सकाळी वाजेपासून तर सायंकाळपर्यंत दर्शनरांगेत गर्दीच होती. शिंगणापूरचे सर्व बाजंूचे रस्ते गर्दीने वेढलेले दिसत होते. वाहनांच्या पार्किंगचे नियोजन शिंगणापूरपासून राहुरी, औरंगाबाद नगरच्या मार्गांवर तीन किमीहून अधिक अंतरावर करण्यात आले होते. मात्र, शिंगणापूर-घोडेगाव मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. ठिकठिकाणी वाहने रस्त्यावरच अडकली होती. पोलिस यंत्रणेकडून वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव जाणवला, तर घोडेगावकडून येणाऱ्या मार्गावर मात्र वाहतुकीचे चोख नियोजन करण्यात आल्याचे दिसले. 


शिंगणापूर हॉस्पिटलसमोरील वाहनतळ ते शिंगणापूर या तीन किमी अंतरासाठी रिक्षाचालकांनी ५० रुपये प्रत्येकी दर आकारला होता. या मार्गात इतर वाहनांना पोलिसांनी बंदी केली. मात्र, रिक्षाचालकांनी गर्दीचा फायदा उठवत पर्वणी साधली. दूर अंतरावरच वाहने अडवली गेल्याने भाविकांना शिंगणापूरपर्यंत तीन किमी पायी यावे लागले. या रस्त्यावर पायी चालणाऱ्या भाविकांचा दुपारपर्यंत महापूर लोटला होता. कमिशन एजंट हे वेगवेगळ्या मार्गाने भाविकांना मंदिर परिसरात घेऊन येत होते. त्यासाठी भाविकांची लुटमार झाली. त्याबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली. 


नगरच्या ब्लड बँकेतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात देशभरातील ६० जणांनी रक्तदान केले. नेवासे परिवहन आगाराने बसेसचेही चोख नियोजन झाले, तर देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी पार्किंगची व्यवस्था केली. सायंकाळची आरती सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आली. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष अनिता शेटे, खजिनदार योगेश बानकर आदींनी यात्रोत्सवाचे नियोजन केले. दरम्यान, शनिदेवसेवासदन हरियाणाले यांच्या वतीने शनिशिंगणापुरात सकाळी नियोजित धर्मशाळेचे देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर प्रवीण बन्सल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 


८० हजार भाविकांना महाप्रसाद 
मुंबईयेथील मेहता परिवार, हरियाणा येथील शनिदेव सेवा समिती, दिल्लीचे विशाल भंडारा, शनिदेव मंडळ फरिदाबाद, दिल्ली येथील पंकज मित्तल या भाविकांकडून सुमारे ८० हजार भाविकांना मोफत महाप्रसाद देण्यात आला. संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी येथील सुमारे ५० युवकांनी शनिशिंगणापूर येथून पायी ज्योत घेऊन गेले. 

बातम्या आणखी आहेत...