आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगावातील हत्याकांडातील सर्व आरोपी सराईत, अल्पवयीन भासवण्याचा प्रयत्न फसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेवगावच्या विद्यानगर कॉलनीतील अप्पासाहेब हरवणे यांच्यासह एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणारे दरोडेखोर आरोपी सराईत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी दोन आरोपींनी अटकेनंतर न्यायालयात अल्पवयीन असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय तपासणीनंतर एक आरोपी सज्ञान असल्याचे सिद्ध झाले आहे. हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार रमेश भोसले याच्याविरुद्ध एकूण ११ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.

शेवगाव हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अल्ताफ छगन भोसले (रा. मुकिंदपूर, नेवासे) याच्यासह आणखी एकाला पकडले. या दुसऱ्या अारोपीने स्वत:ला अल्पवयीन असल्याचे सांगितल्यामुळे सध्या तो बालसुधारगृहात आहे. अल्ताफनेही अल्पवयीन असल्याचा कांगावा केला होता. मात्र, तो सज्ञान असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिले. त्याच्याविरुद्ध औरंगाबाद जिल्ह्यात चार गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे न्यायालयाने जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

अल्ताफ भोसलेने दिलेल्या जन्माच्या दाखल्याची शहानिशा केली असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध औरंगाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय हत्यार कायदा, खुनाचा गुन्ह्याची नोंद आहे. त्यातही त्याचा अल्पवयीन असल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे तपासी अधिकारी तथा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्याला पुन्हा अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. याशिवाय मुख्य सूत्रधार रमेश छगन भोसले (रा. नागफणी, नेवासे) याच्याविरुद्ध ११ गुन्ह्यांची नोंद आहे. 

रमेश भोसलेविरुद्ध नगर जिल्ह्यात सन २००७ पासून तोफखाना, राहुरी, नेवासे, कोपरगाव, तसेच नाशिक, औरंगाबाद जळगाव जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तोफखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करून जबरी दरोडा टाकणे, सिन्नर राहुरी पोलिस ठाण्यात दरोडा, गंगापूर पोलिस ठाण्यात दरोडा टाकून खून करणे, नेवासे पोलिस ठाण्यात एक दरोडा एकदा दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा गुन्ह्याची नोंद आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करून जबरी दरोडा टाकल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. 

शेवगाव हत्याकांडात रमेश, अल्ताफ यांच्यासह आणखी ते आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्वजण सराईत कुख्यात दरोडेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय सुरुवातीला अटक केलेला, सध्या बाल सुधारगृहात असलेला सज्ञान असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. रमेश भोसलेने शेवगाव हत्याकांडानंतर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरातही एक गंभीर गुन्हा केलेला आहे. पोलिस त्याबद्दल त्याची चौकशी करीत आहेत. 

एक लाखांचे बक्षीस 
रमेशभोसले त्याच्या टोळीविरुद्ध जळगाव जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. चाळीसगाव शिवारात दरोडा टाकून खून केलेला आहे. एकूण खुनांची कबुली त्याने दिली. यावेळी त्याने गावठी पिस्तुलाचा वापर केला होता. त्यामुळे जळगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्कानुसार प्रस्ताव तयार केला होता. मात्र, तो फरारच होता. त्याच्या शोधासाठी जळगाव पोलिसांनी तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अखेर नगर पाेलिसांनीच त्याला जेरबंद करण्याची कामगिरी फत्ते केली. 

तेव्हाही दिला चकवा 
रमेशभोसले, अल्ताफ भोसले, मनोहर काळे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज शिवारात शाहरूख नावाच्या नातेवाईकाचा खून केला होता. अंतर्गत वादातून त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याला मारले होते. या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिस त्यांच्या मागावर होते. त्यावेळी नगरच्या गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी पाठलाग करून मनोहर काळेला जेरबंद केले. मात्र, रमेश अल्ताफ भोसले हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा टोळी तयार करून गंभीर गुन्ह्यांचे सत्र सुरूच ठेवले.
बातम्या आणखी आहेत...