आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई समाधीचाही पादुका दौऱ्याच्या विरोधात कौल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- श्री साईबाबा समाधीसमोर टाकण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमध्ये साईंच्या पादुका नेण्यास विरोधाचा काैल मिळाला. त्यामुळे या दाैऱ्याच्या निर्णयाला विराेध अाणखी तीव्र हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान, शिर्डी  संस्थानने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने रविवारपासून ग्रामस्थ व छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. 
 
साईंचा कौल डावलून पादुका बाहेर नेण्याचा प्रयत्न झाल्यास रथासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्ता आसने यांनी दिला आहे.  साईंच्या समाधी शताब्दी वर्षाचे अाैचित्य साधून संस्थानने यंदा साईंच्या पादुकांचा रथ देशभर नेण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवातही झाली अाहे. काही जणांकडून मात्र या निर्णयाला विराेध हाेत अाहे. दोन मतप्रवाह समोर आल्याने रिवाजाप्रमाणे साई समाधीवर चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचे ठरले. यात दौऱ्याला विरोध करावा, असा कौल मिळाल्याने विरोधावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  
बातम्या आणखी आहेत...