आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी: साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित, संस्थान अध्यक्षांशी सकारात्मक चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त मागे घेण्यात आले. कंत्राटी कर्मचारी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, याबाबत अध्यक्ष हावरे यांच्याशी माझी आठ दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांना सांगितले. 

संस्थानच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावे, सेवेत कायम करावे, कामावर कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, जोपर्यत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत पगारवाढ द्यावी, या मागण्यासांठी संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २५ २६ रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. विविध सामाजिक संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शविला होता. यासंदर्भात संस्थानचे अध्यक्ष हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपकार्यकारी अधिकारी संदिप आहेर, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या समवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित कऱण्यात आले. 

पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन देणे, सेवेत कायम करणे याबाबत शासन स्तरावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यत पगारवाढ देणे, ३० टक्के गैरहजर असल्याच्या कारणाने कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणे या विषयावर शनिवारी (२५ फेब्रुवारी) होणाऱ्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत सहानुभूतीपूर्वक सकारात्मक विचार केला जाणार आहे. साईबाबा संस्थानचे काम विस्कळीत होऊ नये, साईभक्तांची सेवा खंडित पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यास अनुकूल प्रतिसाद दिला आहे. 

काम बंद आंदोलन कामे घेण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, यापुढे कामात कसूर कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कऱण्यात येणार असल्याचा इशारा हावरे यांनी दिला आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर हावरे यांच्याशी खासदार सदाशिव लोखंडे,राजेंद्र पिपाडा,राजेंद्र गोंदकर यांनी चर्चा केली आहे. 

संस्थानच्या निर्णयाचे स्वागत 
आपणमंत्रीअसताना कंत्राटी कामगारांचा प्रश्न सोडवला होता.संस्थानमधील उर्वरित कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य सरकारशी आपण सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचे मी स्वागत करतो.'' राधाकृष्णविखे, विरोधीपक्षनेते.
बातम्या आणखी आहेत...