आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी साईसंस्थान आयएएस प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- राज्यातील गोरगरीब, आदिवासी, वंचित व दुर्बल विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची मोफत पूर्वतयारी तयार करून घेण्यासाठी निवृत्त राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी साईसंस्थान आयएएस अकादमी सुरू करणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. डॉ. हावरे म्हणाले,  राज्यात अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक अडचणीमुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा  देता येत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी संस्था मोफत अकादमी सुरू करणार आहे.
  
तिरुपती बालाजी येथे भक्त ज्याप्रमाने केस दान करतात त्याप्रमाने शिर्डीत साईच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर गुरुवारी येणाऱ्या भक्तांनी रक्तदान करावे यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्यातील विविध रक्तपेढ्यांना रक्त संकलनासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले.  साईबाबा समाधी मंदिराजवळील श्री गुरुस्थान मंदिरालगत पुरातन निंबवृक्ष बाबांच्या काळापासून आहे. या निंबवृक्षाची महती सर्वदूर आहे. या निंबवृक्षाच्या एका फांदीची पाने गोड असल्याने त्यापासून टिश्युकल्चर पद्धतीने रोपे तयार करून जगभरातील साईमंदिरांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  
पालखी निवारे उभारणार
गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पुणे, मुंबई व देशातील इतर राज्यांच्या विविध भागांतून वर्षभर साईंच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर साईभक्त साईंची पालखी घेऊन येतात. पायी येणाऱ्या पालखीतील पदयात्रींची मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी विद्यमान सुविधा अपूर्ण पडत असल्याने मंुबई ते शिर्डी या मार्गावर दर तीस किलोमीटर अंतरावर साईपालखी निवारे  उभारण्यात येणार आहेत. साईसंस्थानच्या माध्यमातून नव्याने गोशाळेची निर्मिती करून या गोशाळेत गावरान गायींचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...