आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास शिवसैनिकांनी प्राधान्य द्यावे- माजी आमदार अनिल राठोड यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केंद्रात राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. शिवसेनेचाच महापौर असल्याने मनपाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्यात येत आहेत. नगरमध्ये शिवसेनेच्या अनेक शाखा सुरु करण्यात येणार आहेत. युवावर्ग शिवसेनेला मानणारा आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 
 
अभिषेक भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना राठोड बोलत होते. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, गणेश कवडे, दिगंबर ढवण, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, दीपक भोसले, अशोक दहिफळे, निखिल होगले, अरुण झेंडे, सनी खैरे, शंतनु डुबे, वैभव ढगे आदी उपस्थित होते. 

राठोड म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे. सामान्य नागरिक शिवसैनिकाकडे आल्यानंतर नागरिकाला कुटुंबप्रमुखाकडे आल्यासारखे वाटले पाहिजे. शिवसैनिक हा अन्याय, अत्याचारांच्या विरोधात लढणारा असावा. एकदा भगवा झेंडा खाद्यांवर घेतला की, तो त्याच्याशी एकनिष्ठ असावा. याच माध्यमातून समाजकारण राजकारणात आपला ठसा उमटवा. शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन राठोड यांनी केले. 
 
सातपुते म्हणाले, जनतेचा सर्वात जास्त विश्वास शिवसेनेवर आहे. सर्वसामान्यांना संधी देणारा हा पक्ष आहे. शिवसेनेच्या माध्यमातून शहराचा चेहरा बदलणार आहे. शिवसेना ही संरक्षण करणारी संघटना अाहे. त्यामुळेच युवावर्ग सेनेकडे आकर्षित होत अाहे. 
 
फुलसौंदर म्हणाले, भोसले आखाडा, बुरुडगाव रस्ता हा परिसर शिवसेनेला मानणारा आहे. त्यामुळे या भागातील प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य असेल. या भागातील अनेक कामांचे प्रस्ताव दिले असून, ही कामे लवकरच आपण पूर्ण करू. सूत्रसंचालन नगरसेवक गणेश कवडे यांनी केले, तर संतोष गेनप्पा यांनी अाभार मानले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...