आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्षांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांची दमछाक, निवडणूक व्यक्तीकेंद्रित होण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ७३ जिल्हा परिषद गटांसाठी ८६३ अर्ज वैध ठरले. त्यापैकी ३०० अर्ज अपक्षांचे आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून अपक्ष उमेदवारांच्या माघारीसाठी मनधरणी सुरू आहे. ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार सक्षम आहेत, अशांना माघार घेण्याची विनंती करताना राजकीय पक्षांची दमछाक होत आहे. 
 
गट गणांसाठी सुमारे हजार ५०० अर्ज दाखल झाले. त्यापैकी गटांसाठी ८६३ गणांसाठी हजार ५२७ अर्ज वैध ठरले. ज्यांचे अर्ज नामंजूर झाले, त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म देताना अनेकांच्या नाराजीचा सामना नेत्यांना करावा लागला. याच नाराजीतून बंडखोरीला बळ मिळाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र आघाडी स्थापन केली. नंतर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार दिले. शेवगाव तालुक्यात भाजपच्या निष्ठावान हर्षदा काकडे यांना डावलण्यात आले. तसाच प्रकार नगर तालुक्यातही घडला. जिल्हाभरात स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाड्या करत आहेत. सक्षम अपक्ष रिंगणात आहेत. 

संभाजी ब्रिगेड, गडाखांचा क्रांतिकारी शेतकरी पक्ष, बहुजन समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्षानेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूक पक्षकेंद्रित नव्हे, तर व्यक्तीकेंंद्रित होणार आहे. चांगल्या सक्षम उमेदवारालाच कौल मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज करण्यात पक्षांसमोर अपक्ष उमेदवार हा मोठा अडथळा निर्माण करू शकतात, याची जाणीव असल्याने अपक्षांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. कार्यकर्त्यांची शिष्टमंडळे भेटीगाठी घेऊन अर्ज माघारीची विनंती करीत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात फारसे सक्षम नसलेले, पण मतांच्या विभाजनास कारणीभूत ठरणाऱ्या उमेदवारांचीही संख्या मोठी अाहे. याचा कानोसा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अर्ज माघारीसाठी मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही अंतिम मुदत आहे. 
 
सोशल मीडियावरील प्रचाराला वेग 
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. स्थानिक पातळीवर व्हाॅट्स अॅप ग्रूपवर जोरदार प्रचार सुरू आहे. परंतु हा प्रचार उमेदवार स्वत: करत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात घोंगडी बैठका, चौक बैठका सुरू आहेत. 

माघार घोडेबाजार उधळण्याची चिन्हे 
अर्ज वैध ठरलेल्या काही अपक्षांंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सक्षम उमेदवारांनाही गळ घातली जात असून घोडेबाजार उधळणार आहे. माघारीची मुदत संपल्यानंतरही रिंगणात असलेल्या अपक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी बाजार तेजीत असेल