आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठेपणा अन् मानपानाला फाटा, रेशीमगाठीत शोधल्या सामाजिक वाटा, साध्या विवाहाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनिक दिव्य मराठीने १२ डिसेंबरला प्रकाशित केलेले वृत्त. - Divya Marathi
दैनिक दिव्य मराठीने १२ डिसेंबरला प्रकाशित केलेले वृत्त.
नगर - लग्नसमारंभ म्हटले की, खर्चिक निमंत्रण पत्रिका, बँण्ड, थाटमाट, मानपान आणि मोठेपणा…पण आता हा प्रकार कमी होत आहे. लग्नानिमित्त नव्या सामाजिक वाटा शोधण्याचे सकारात्मक पाऊल पडताना दिसत आहे. असेच पाऊल नगरमध्ये पडत आहे. दैनिक दिव्य मराठीने सोमवारी ‘साध्या पद्धतीने लग्न लावत जपली सामाजिक बांधिलकी...’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यातून प्रेरणा घेत व्यावसायिक अरुण बोरा यांनीही त्यांच्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न म्हणजे कसे थाटात व्हायला पाहिजे, यावर सर्वांचाच भर असतो. लग्नपत्रिका, विविध पदार्थांची मेजवानी, बँड आदींवर मोठा खर्च होतो. मात्र, हे समाजातील सर्वांनाच शक्य होत नाही, तसेच या होणाऱ्या खर्चाचा काहीही उपयोग होत नाही. या खर्चाला फाटा देत नगरमधील चार्टर्ड अकाउंटंट अशोक पितळे यांनी त्यांच्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने केला. त्याला ‘दिव्य मराठी’ने सकारात्मक प्रसिद्धी सोमवारी (१२ डिसेंबर) दिली. त्यातून प्रेरणा घेत व्यावसायिक अरुण बोरा यांनीही त्यांच्या मुलाच्या विवाहात सर्व खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने म्हणजे मुलाकडील ५० मुलीकडील ५० अशा मोजक्याच १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत रविवारी (१८ डिसेंबर) विवाह होणार आहे. बोरा यांचा मुलगा अमित होणारी सून ऋतुजा हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. लग्नावर होणारा खर्च टाळून अनाथांना अन्नदान, कपडे दिले, तर त्यातून मिळणारे आत्मिक समाधान खूप मोठे असेल, असे बोरा यांनी सांगितले.

अनाथालयाला वर्षभर अन्नधान्य
-हाविवाहसाध्या पद्धतीने करण्याची प्रेरणा "दिव्य मराठी’चे वृत्त वाचून मिळाली. या विवाहातून वाचलेल्या रकमेतून रिमांड होम, अनाथालयाला वर्षभर अन्न-धान्य, किराणा, गरजेच्या वस्तू देऊ. ज्या रिमांड होम किंवा अनाथालयामध्ये भांडी नाहीत, तेथे भांडी देऊ.
अरुणबोरा, व्यावसायिक, नगर.
सर्व समाजांनी अनुकरण करावे
-लग्नात अनावश्यक खर्चामुळे अनेकांचे आयुष्य कर्ज फेडण्यात जाते. त्यामुळे पितळे बोरा यांच्या निर्णयाचे सर्व समाजांनी अनुकरण करणे आवश्यक आहे. पुढील काळात अशा साध्या विवाहांबरोबरच आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुटुंबांचा समाजाने सत्कार करायला हवा.'' प्रदीपगांधी, संचालक, कोहिनूर.
बातम्या आणखी आहेत...