आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रब्बीचे क्षेत्र २० टक्क्यांनी वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातपरतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात २० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीपूर्व मशागती सुरू केल्या आहेत.

नगर जिल्ह्यात ते १५ जून या कालावधीत मान्सूनचा पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र अकोले वगळता तेरा तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरपर्यंत केवळ ४१ टक्के पाऊस झाला होता. काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरिपाच्या लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र, पावसाअभावी खरिपातील पिके जळून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त रब्बीवर होती.शुक्रवार (४ सप्टेंबर) पासून नगर जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल १० टक्के पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदे, नगर, पारनेर, राहुरी, राहाता, संगमनेर या तालुक्यांत गेल्या आठ दिवसांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीसाठी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींना सुरुवात केली आहे. रब्बीसाठी शेतकऱ्यांची बी-बियाणे खते खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात एकूण क्षेत्र १७ लाख २० हजार आहे. त्यात खरिपाचे लाख २० हजार हेक्टर, तर रब्बीचे लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र आहे. परतीच्या पावसामुळे यंदा तब्बल लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या होतील, असा अंदाज आहे. रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाने बियाणांचे अतिरिक्त नियोजन केले आहे.

कृषी विभागाकडून रब्बीसाठी ७८ हजार ५०० क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आलेली आहे. रब्बी हंगामात ज्वारी लाख १० हजार हेक्टर, गहू लाख ३७ हजार, मका ५५ हजार, हरभरा लाख २५ हजार, करडई हजार, सूर्यफूल हजार जवस ७९० हेक्टर, अशा पिकांच्या पेरण्या होण्याची शक्यता आहे. रब्बीसाठी कृषी पतपुरवठ्याचे कोटी १९ लाख ८० हजार रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीतून हे नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी २०१४-१५ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोटी २५ लाख ३७ हजारांचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी ८६ हजार ५९९ खातेदारांना कोटी ७४ लाख ९६ हजार रुपये कर्जाचे वाटप विविध खासगी, सहकारी, ग्रामीण सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्याचबरोबर रब्बी हंगामात क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन हाती घेतले आहे.

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके
रब्बीहंगामात बी-बियाणे खते यांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार केली आहेत. यंदा ज्वारीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज आहे.