आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय महापेक्स प्रदर्शनात नगरने पटकावली दोन पदके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नाशिक येथे १६ ते १८ जानेवारीदरम्यान झालेल्या महाराष्ट्र गोवा राज्यस्तरीय ‘महापेक्स’ या टपाल तिकिटांच्या स्पर्धेत नगर जिल्ह्याला दोन मानाची पदके मिळाली. जामखेड येथील पोपटलाल हळपावत यांना सुवर्ण, तर नगरचे सचिन डागा यांना रौप्यपदक मिळाले.
हळपावत यांना ‘नारी - एक महान शक्ती’ या विषयावरील तिकिटांच्या सादरीकरणासाठी सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. नगर येथील सचिन जुगराज डागा यांनी भारतीय संस्थानिकांच्या रेव्हेन्यू, पिस्कल्स् पोस्टेज या विभागात रौप्यपदक पटकावले. दोन्ही संग्राहकांचा फिलाटेलीच्या वेगवेगळ्या राष्ट्रीय राज्यस्तरीय संस्थांशी संबंध असून मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पारितोषिक वितरण सोहळ्यास नवी दिल्लीचे असिस्टंट-पोस्टल सर्व्हिसेस प्लँनिंगचे एस. के. सिन्हा, चिफ पोस्टमास्तर जनरल अशोककुमार दास उपस्थित होते. परीक्षक म्हणून धनंजय देसाई यांनी काम पाहिले.

महिला शक्ती किती महत्त्वाची आहे, महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केली आहे, याचे मनोज्ञ दर्शन हळपावत यांच्या तिकीट संग्रहातून होत असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

पुरस्कार मिळाल्यानंतर डागा यांनी नगर पोस्टल विभागाबाबत नाराजी व्यक्त केली. चार-पाच वर्षांपासून खासदार दिलीप गांधी यांनी पाठपुरावा करून सुरु केेलेले फिलाटेली काऊंटर पोस्टल विभागाच्या निद्रिस्त कारभारामुळे बंद पडले आहे. त्यामुळे नगरमधील संग्राहकांना पुणे, मुंबई किंवा इतर फिलाटेली ब्युरोमधून तिकिटांचा संग्रह करावा लागतो. नवीन संग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात पुणे विभागाच्या पोस्टमास्तरांशी पत्रव्यवहार केला आहे. फिलाटेली काऊंटर पुन्हा सुरु करावे, असे डागा म्हणाले.

जामखेड येथील पोपटलाल हळपावत यांना सुवर्ण, तर (खाली) नगर येथील सचिन डागा यांना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.