नगर- जिल्ह्यातील २२ पैकी २० साखर कारखान्यांनी सोमवारी ५१ लाख टन उसाच्या गाळपाचा टप्पा ओलांडला. गाळप करण्यात आलेल्या उसाची एफआरपीनुसारची किंमत १३०० कोटींच्या घरात जाते. यातील तोडणी वाहतूक खर्चाचे ३०० कोटी वजा जाता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. मात्र, काही कारखान्यांचा अपवाद वगळता हक्काच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यात १४ सहकारी, तर खासगी साखर कारखाने आहेत. यंदा यातील डॉ. तनपुरे हा सहकारी हिरडगावचा साईकृपा हा खासगी कारखाना सुरू होऊ शकला नाही. उर्वरित २० कारखान्यांनी उपलब्ध उसाचे गाळप सुरू केले. यातील नगर तालुका (पीयूष) या खासगी कारखान्याने हजार टन गाळपानंतर डिसेेंबरच्या मध्यात गाळप बंद केले. यंदाच्या हंगामात २० कारखान्यांनी आतापर्यंत ५१ लाख १५ हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात ८० लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज आहे. उपलब्ध उसापैकी जवळपास ६५ टक्के उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. आतापर्यंतच्या गाळपातून ५३ लाख हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने यंदा साडेनऊ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन २३०० रुपये एफआरपी जाहीर केला आहे. साडेनऊ टक्क्यांच्या पुढील प्रत्येक एक टक्का अधिक साखर उताऱ्याला प्रत्येकी २४२ रुपये अधिक द्यावयाचे आहेत. एकूण एफआरपीतून तोडणी वाहतूक खर्च वजा जाता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांकडून अदा करण्यात येते. सोमवारपर्यंत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचा एकूण एफआरपी १३०० कोटींच्या घरात जातो. यातून तोडणी वाहतूक खर्च वजा जाता एक हजार कोटी शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देताना हात आखडता घेण्यात येत असून ठरल्यानुसार पहिल्या टप्प्यात एफआरपीची ८० टक्के रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात पडत नसल्याचे चित्र आहे.
अंबालिकाने लाख ३५ हजार टन गाळप करून आघाडी घेतली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या एकूण गाळपातील साडेबारा टक्के उसाचे गाळप या एका कारखान्याने केले असून लाख १३ हजार क्विंटल साखर उत्पादन करून उत्पादनातही आघाडी घेतली आहे. मात्र, याच कारखान्याकडे यंदाच्या गाळप उसाचा सर्वाधिक एफआरपी थकीत आहे.
साखर उतारा १०.४%
जिल्ह्यात आतापर्यंत गाळप करण्यात आलेल्या उसाचा सरासरी साखर उतारा १०.३८ टक्के आहे. गेल्या वर्षी हंगाम संपताना सरासरी साखर उतारा ११ टक्क्यांवर पोहोचला होता. यंदा उताऱ्यात गेल्या वर्षीपेक्षा किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. साडेनऊ टक्क्यांच्या वरील साखर उताऱ्याचा हिशेब गृहीत धरता सध्याचा सरासरी उतारा जवळपास एक टक्क्याने अधिक आहे.
गाळपाची स्थिती
अंबालिका (इंडेकॉन) - लाख ३५ हजार, ज्ञानेश्वर - लाख ९५ हजार, गंगामाई - लाख २८ हजार, थोरात - लाख हजार, मुळा - लाख ६९ हजार, नागवडे - लाख ३८ हजार, कुकडी - लाख ३५ हजार, विखे - लाख ३५ हजार, संजीवनी - लाख हजार, के. एस. काळे - लाख ६५ हजार, अशोक - लाख ४८ हजार, अगस्ती - लाख हजार, प्रसाद - लाख ६५ हजार, वृद्धेश्वर - लाख ६२ हजार, गणेश - लाख ४१ हजार, जय श्रीराम - लाख २२ हजार, साईकृपा - लाख हजार, क्रांती (पारनेर) - ४४ हजार, केदारेश्वर - १० हजार, नगर तालुका (पीयूष) - टन हजारात.