आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूरज जाधव खूनप्रकरणी दोषीस आजन्म कारावास; इतर चार अारोपींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेल्या सूरज जाधव खून प्रकरणातील मुख्य आरोपीला शुक्रवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची, तर अन्य चार अारोपींना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. आणखी दोन अल्पवयीन आरोपींचा या गुन्ह्यात समावेश होता. अकोले रस्त्यावरील पेटिट हायस्कूलसमोर २०१४ मध्ये ही घटना घडली होती. 


विनायक गणपत भोर असे आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून सागर शंकर ढोले, मुकुंदा भरत ढोले, प्रसाद भरत ढोले, ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढाेले यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. पेटिट हायस्कूलसमाेरील अकोले बायपासवर २० ऑगस्ट २०१४ रोजी रात्री नऊच्या सुमारास नीलेश रमेश ढोले याने आरोपी ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने ढोले याने अन्य आरोपींना एकत्र जमवून फिर्यादी आणि त्याच्या साथीदाराना मारहाण केली. विनायक भोर याने सूरज कैलास जाधव याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याला ठार मारले. त्याचा साथीदार योगेश ढोले यालादेखील जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर सुऱ्याने वार करत त्याला फिर्यादी नीलेश ढोले यांना गंभीर जखमी केले. 


याच दरम्यान आरोपी भोर याच्याकडील सुरा दुसरा आरोपी सागर शंकर ढोले याला लागल्याने तोही जखमी झाला. नीलेश ढोले याच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात विनायक गणपत भोर, सागर शंकर ढोले, मुकुंदा भरत ढाेले, प्रसाद भरत ढोले, ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले आणि दोन अल्पवयीन आरोपीविरोधात खुनाचा, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 


पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध घेत त्यांना लगेच अटक केली होती. तत्कालिन पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी या गुन्ह्याचा तपास केला. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांच्यासमाेर या खटल्याची सुनावणी सुरु होती. 

बातम्या आणखी आहेत...