आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखेंचे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला सलाम ठरेल; सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- समाजवादी विचाराला आधुनिकतेची जोड देणारे एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब विखे यांची ओळख भारतीय राजकारणात होती. त्यांच्या आठवणींचे प्रतीक म्हणून उभे राहत असलेले स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला सलामच ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. 

दिवंगत नेते विखे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विखे कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात येणाऱ्या स्मृतिस्थळाच्या भूमिपूजनप्रसंगी शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम होते. या कार्यक्रमास माजी मंत्री बी. जे. खताळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, खासदार दिलीप गांधी सदाशिव लोखंडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, अरुण जगताप, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, राहुल जगताप, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, कैलास कोते, नगराध्यक्ष योगिता शेळके आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, सहकार चळवळीला बाळासाहेबांनी आधुनिकतेची जोड दिली. स्वतंत्र पक्ष काढण्याची ताकद या व्यक्तिमत्वात होती. नगर जिल्हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असतानाही पद्मश्रींनी सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी समाजवादी रचनेचा पाया रुजवला आणि देशाला नवी दिशा दिली. हेच काम बाळासाहेबांनी पुढे नेले. हा इतिहास नव्या पिढीने अभ्यासला पाहिजे. 

कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण 
खासदारसाहेबांचे स्मृतिस्थळ कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे ठरेल. त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत सहकारी म्हणून काम करणाऱ्यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे, हा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण क्षण आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...