आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाची आत्महत्या; मुख्याध्यापिकेसह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - शाळेतील मुलींशी गैरवर्तनाच्या आरोपामुळे बदनामीच्या भीतीने आणि निलंबनाच्या धमकीमुळे निमगाव डाकू (ता. कर्जत) येथील जाधव वस्ती शाळेचे शिक्षक रामचंद्र जाधव (वय ५०) यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली. तशी फिर्याद मृताच्या मुलाने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून पोलिसांनी मुख्याध्यापिका जनाबाई अंबादास पाखरे (बाभुळगाव खालसा) शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट माणिक जाधव (निमगाव डाकू) यांच्याविरुद्ध आत्महत्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
मृत जाधव यांचा मुलगा सुभाष रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, श्रीगोंदे येथे मी शिक्षण घेत आहे. त्याच तालुक्यातील आढळगाव येथे मामाकडे राहतो. माझे वडील रामचंद्र यांनी मला फोन करून तातडीने बोलावून घेतले. मी निमगाव डाकू येथील घरी आलो, असता यावेळी माझे वडील मला म्हणाले, मी शाळेतील मुलीशी कोणतेच गैरवर्तन केले नसताना माझ्यावर उगीचच शाळेच्या मुख्याध्यापिका जनाबाई पाखरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट जाधव यांनी आरोप केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...