नगर - लालटाकी भागातील खाकीदास मठासमोर दुचाकीस्वाराचा चिनी मांजाने गळा कापला गेला. युवक गंभीर जखमी असून त्याला पुणे येथे हलवण्यात आले आहे. सिव्हिल हडको भागातील महेश अशोक नेरकर (वय २८) याचे १९ फेब्रुवारीला लग्न आहे. लग्नाच्या पत्रिका छापण्यासाठी तो सिव्हिल हडको येथून मोटारसायकलने अप्पू हत्ती चाैकातून दिल्ली गेटकडे जात असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याच्या गळ्यात चिनी मांजा अडकला. त्याची मोटारसायकल घसरली. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकलची त्याला धडक बसली. मांजामुळे त्याच्या गळ्याला आठ टाके तर मानेला पाच टाके पडले आहेत.