आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्यातील अडीचशे वर्षांपूर्वीची पंचधातूंच्या मूर्तीची दिवसा चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - येथील मध्यवस्ती मधील दिगंबर जैन मंदिरातून अडीचशे वर्षांपूर्वीची पंचधातूंची मूर्ती शनिवारी चोरीला गेली. वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 
 
संतोषकुमार सोनी यांनी याबाबत फिर्याद दिली. शहराच्या मध्यवर्ती पेठेत रस्त्यालगत तालुक्यातील एकमेव दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिराचे पाच वर्षांपूर्वी नूतनीकरण केले होते. नेहमीप्रमाणे डॉ. प्रदीप बडजाते सोनी साडेनऊ वाजता मंदिरातून पूजा करून परतले. त्यानंतर सव्वा दहा वाजता डॉ. बडजाते यांच्या पत्नी पुजेसाठी मंदिरात गेल्या. त्यावेळी मंदिरातून मूर्ती गायब झाल्याचे उघड झाले. ही माहिती समजताच मंदिर परिसरात गर्दी झाली. चोवीस तिर्थंकारांची पंचधातूंची ही अडीचशे वर्षे जुनी मूर्ती होती. फिर्यादीत मूर्तीचे मूल्य दोन लाख रुपये नमूद केले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मोल कोट्यवधी रुपये असू शकते. तीन किलो वजनाची सव्वा फूट उंचीची ही मूर्ती बडजाते यांच्या पूर्वजांनी येथे आणली होती. मंदिराचे प्रवेशद्वार रात्री बंद असते, तर दिवसा काही तासच उघडले जाते. 
 
दरम्यान, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश बोरा, बाजार समितीचे संचालक सतीश पोखरणा, कुकडीचे माजी संचालक चंद्रकांत कटारिया, अनिल गांधी, बाबाजी मुथ्था, नवनीत मुनोत, सुरेश भंडारी, नितीन कटारिया, पवन मुनोत, महावीर मुनोत, शुभम मुनोत यांनी निरीक्षक बाजीराव पोवार यांची भेट घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्याची मागणी केली. 
 
चोरट्याने दोनच मिनिटांत या दुर्मिळ मूर्तीची चोरी केली. मंदिरा शेजारील डॉ. प्राची भापकर यांच्या सीसिटीव्ही फुटेजमधून ही बाब उघडकीस आली. सडपातळ व्यक्ती सकाळी ९.५२ वाजत मंदिरात जाताना दिसली दोनच मिनिटांत मंदिरातून मूर्ती घेऊन बाहेर पडली. 
बातम्या आणखी आहेत...