आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याची आदर्श पिढी घडवण्यासाठी बालमन सुसंस्कृत करावे : अानंदकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- उद्याची आदर्श पिढी घडवण्यासाठी आजचे बालमन सुसंस्कृत केले पाहिजे. त्याचे महत्त्व सनराईजने ओळखले आहे. कर्तबगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा त्यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी येथे केले. 
येथील सनराईज मोहटादेवी सेवा प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सनराईज पुरस्कार देऊन गैरवण्यात आले. त्यावेळी आनंदकर बोलत होते. यावेळी सनराईजचे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विद्यार्थी-पालक मेळावा पारितोषिक वितरण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते झाले. 
 
डॉ. म्हस्के आनंदकर यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल स्नेहालयाचे सचिव अनिल गावडे यांना, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी अरिफ शेख यांना सनराईज पुरस्कार देऊन गाैरवण्यात आले. शैक्षणिक कार्याबद्दलचा पुरस्कार डॉ. एस. पी. लवांडे यांना देण्यात आला. कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल अरविंद कापसे, अनिता खेतमाळीस यांना गौरवण्यात आले. 
 
आनंदकर म्हणाले, चांगले काम करता येत नसेल, तर किमान काम करणाऱ्यांना पाठबळ द्या. समाजात विधायक काम करणारे खूप घटक आहेत. त्यांना कौतुकाची थाप हवी आहे. त्यातून अशांना हुरूप मिळेल. कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी गुलाब सय्यद, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, प्रा. नीलेश मुनोत, नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अर्चना गोरे, प्रा. एकनाथ खाेडदे, राजू गोरे, प्रशांत गोरे, अॅड. ऋषिकेश गायकवाड, अॅड. संतोष मोटे आदी उपस्थित होते.
 
प्रास्ताविक प्राचार्या राजश्री शिंदे यांनी, तर आभार सनराईजचे प्रमुख सतीश शिंदे यांनी मानले. महिला दिनानिमित्त तालुक्यातील तीन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात लोणी व्यंकनाथच्या मालनबाई धोंडिबा काकडे, श्रीगोंद्याच्या सुरेखा शिवाजी शिंदे शालन सीताराम पोटे यांचा समावेश होता. 
 
आदर्श ठरवून घ्या 
-जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर सर्वोच्च ध्येय ठेवावे. "टॉप’वर जाण्याची जिद्द असेल, तर यश दूर नाही. विद्यार्थ्यांनी आपला आदर्श कोण आहे हे ठरवून घ्यावे. कष्टातून खडतर स्थितीचा सामना करीत उच्चपदापर्यंत पोहोचलेल्या मान्यवरांचे जीवन अभ्यासावे. '' अनुराधानागवडे, सदस्य, जिल्हा परिषद. 
बातम्या आणखी आहेत...