आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 पोलिस निरीक्षकांना हवी जिल्ह्याबाहेर बदली, कामाचा ताण सहन होत नसल्याचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील ३१ पैकी २० पोलिस निरीक्षकांनी जिल्ह्याबाहेर जाण्याकरिता विनंती बदलीचे अर्ज केले आहेत. यापैकी काही निरीक्षकांनी पोलिस ठाण्यातील कामाचा ताण सहन होत नसल्याची कारणे नमूद केली आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात आलेल्या निरीक्षकांना परतीचे वेध लागले आहेत. १० निरीक्षकांनी बदलीसाठी यापूर्वीच अर्ज दिले होते. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस पोलिस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण २९ ठाणी एकूण ३१ निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यापैकी २० जणांनी विनंती बदलीसाठी पोलिस अधीक्षकांमार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे अर्ज पाठवले आहेत. त्यांच्या अर्जावर येत्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या संख्येने पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या दृष्टीने जिल्ह्यातील बदलीचे ठिकाण गैरसोयीचे वाटत असले, तरी निवडणूक आयोगाचे आदेश असल्यामुळे अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागले होते.
काही दिवसांपूर्वीच उपअधीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शेवगाव उपविभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील नगर ग्रामीण उपविभागाच्या उपअधीक्षक अनिता जमादार यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. बदलून गेलेल्या या उपअधीक्षकांच्या जागेवर अद्याप नवे उपअधीक्षक हजर झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या उपअधीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण आहे. येत्या एक-दोन आठवड्यांत जिल्ह्यात रिक्त असलेल्या उपअधीक्षकांच्या जागेवर नवे अधिकारी मिळतील, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्याबाहेर बदली मिळावी, यासाठी विनंती अर्ज सादर केलेल्या बहुतांश पोलिस निरीक्षकांनी कामाच्या अतिरिक्त तणावाचे कारण अर्जात नमूद केले आहे. काही निरीक्षकांनी कौटुंबिक वैयक्तिक अडचणी सांगितल्या आहेत. खासगीत बोलताना सर्वच अधिकारी वरिष्ठ अधिकारी तपासकामात हस्तक्षेप करत नाही, पोलिस ठाण्याच्या अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी स्वातंत्र्य असल्याचे सांगतात. मग, एकाच वेळी एवढ्या संख्येने विनंती बदली करण्याचे नेमके कारण काय, हा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कामाची पद्धत अंगवळणी पडत नसल्यामुळे पोलिस निरीक्षक जिल्ह्याबाहेर जाण्यास इच्छुक आहेत, अशीही चर्चा आहे.
नियंत्रण कक्षात तीन निरीक्षक सहायक निरीक्षक असताना श्रीरामपूर शहर ग्रामीण, श्रीगोंदे या ठाण्यांना निरीक्षक दर्जाचा अधिकारी नाही. या ठाण्यांच्या कारभार शेजारच्या ठाण्यातील निरीक्षक अथवा सहायक पोलिस निरीक्षकांकडे सोपवलेला आहे. याला काही वादग्रस्त पोलिस निरीक्षकही जबाबदार आहेत. जिल्हा वाहतूक शाखेलाही अद्याप पाेलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी दिलेला नाही. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांची काही महिन्यांपूर्वीच कोतवालीत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेचा कारभार सहायक निरीक्षकाकडे आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, याबाबत आणखी...