आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : जप्त केलेल्या तुरीचे आज उलगडणार गौडबंगाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-मनमाडरस्त्यावर मे रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या तुरीबद्दलचा अहवाल गुरूवारी प्राप्त होणार आहे. नाफेडच्या अधिकाऱ्यांनी या तुरीची पाहणी केली होती. पाथर्डीच्या सहायक निबंधकांचा या तुरीबद्दलचा अहवाल दुपारी पर्यंत मिळाल्यानंतर संबंधित दोषींवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया केली जाईल, असे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आठ दिवसांपासून पडून असलेल्या या तुरीचे गौडबंगाल उकलणार आहे.
 
व्यापाऱ्यांनी मातीमोल दराने खरेदी करुन साठा करुन ठेवलेली तूर विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे सहकाऱ्यांनी मनमाड रस्त्यावर छापा टाकून दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यात तब्बल ४२ टन तूर होती. ट्रकचालकांना याबाबत व्यवस्थित माहिती सांगता आल्याने दोन्ही वाहने एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेऊन लावली. 

तुरीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. नाफेडचे मार्केटिंग अधिकारी जी. एम. मगरे सहकाऱ्यांसह नगरमध्ये दाखल झाले. त्यांनी वाहनचालकांकडे चौकशी केली. तुरीच्या पावत्याही तपासल्या. ही तूर पाथर्डी बाजार समितीतून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, या पावत्यांमध्ये बरीच तफावत होती. वाहनांचे क्रमांक वेगळे होते, तर पोलिसांनी पकडले त्यावेळी वाहनांचे क्रमांक वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. 
तूर खरेदी करुन ज्या ट्रान्सपोर्टमार्फत तिची वाहतूक केली जाणार होती. तिची भूमिकाही संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पाथर्डी तालुक्यातील एक व्यक्ती तूर तस्करीच्या रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. त्यानेच तूर ट्रकसह काही दिवसांपूर्वी गायब केली होती. त्याची सविस्तर चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानेही पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. 
 
ट्रक सोडवण्यासाठी समितीच्या प्रशासनाकडे १५ लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप संचालकांनी केला होता. मे रोजी बाजार समितीने बैठक घेऊन फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला. पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी संचालक मंडळाने केली होती. गुरूवारी याबद्दलचा अहवाल मिळणार असल्याने तुरीचे गौडबंगाल उजेडात येऊन दोषींवर कारवाई होणार आहे. 
 
अहवाल येताच गुन्हा 
- आम्ही दोन ट्रक ताब्यात घेतले. त्यात ४२ टन तूर आढळली. ही तूर व्यापाऱ्यांनी आधी अल्पदरात खरेदी केल्याचा संशय होता. शासनाने हमीभाव जाहीर झाल्यानंतर तुरीचा साठा बाजारात विक्री करण्यासाठी नेला जात असल्याची शक्यता आहे. कारवाईचा पंचनामा सुरुवातीलाच केलेला आहे. नाफेडचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली होती. त्यांचा तपासणी अहवाल येताच संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला जाईल.
’’ दिलीपपवार, पोलिस निरीक्षक, एलसीबी. 
 
कडक कारवाई 
- जप्त केलेल्या तुरीबद्दल शहानिशा करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी पाथर्डीचे सहायक जिल्हा उपनिबंधक हरिश कांबळे यांची नियुक्ती केली होती. आठ दिवस त्यांनी या तुरीबद्दल सर्वंकष शहानिशा केलेली आहे. बुधवारी दुपारी पर्यंत त्यांचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या रॅकेटमध्ये कोणीही आरोपी असले, तरी त्यांची गय केली जाणार नाही. दोषींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
'' जी.एम. मगरे, अधिकारी, नाफेड. 
बातम्या आणखी आहेत...