आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये दोन कोटींचा गुटखा जप्त, 300 गोण्यांचा ट्रक एमआयडीसीत पकडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निंबळक बायपासवर पोलिसांनी सुमारे तीनशे गाेण्यांमध्ये भरलेला गुटखा पकडला. - Divya Marathi
निंबळक बायपासवर पोलिसांनी सुमारे तीनशे गाेण्यांमध्ये भरलेला गुटखा पकडला.
नगर - एमआयडीसी परिसरातील निंबळक बायपासवर पोलिसांनी सुमारे तीनशे गाेण्यांमध्ये भरलेला गुटखा पकडला. राज्यात गुटखाविक्रीस बंदी असूनही अवैध पद्धतीने या गुटख्याची तस्करी होत होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाला खबर लागताच त्यांनी सायंकाळी सापळा रचून ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे दोन कोटींच्या घरात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत मुद्देमालाची तपासणी करत होते. 
बंदी असलेला गुटखा घेऊन एक ट्रक जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्यासह पोलिस हवालदार राजू वाघ, भरत डंगोरे, गणेश डहाळे, नरेश कोडम आदींच्या पथकाने सापळा रचून निंबळक बायपासने एक ट्रक (एमपी ०९ एचजी ०८८९) अडवला. त्यामध्ये गुटख्याने भरलेल्या गोण्या पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी ट्रकचालक क्लीनरला ताब्यात घेतले. 

महादेव राजप्पा कांबळे (३०, बसवकल्याण, कर्नाटक) अंबर कलाप्पा ढोली (२१, हमनाबाद, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. कांबळे हा चालक, तर ढोली हा क्लीनर आहे. पोलिसंानी त्यांची कसून चौकशी केली. हा ट्रक हैदराबादहून आल्याचे त्यांनी सांगितले. ट्रकमधील गुटखा संगमनेरला पोहोच करणार होतो, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी ट्रक तपासून पाहिला असता त्यामध्ये सुमारे ३०० गोण्या भरुन गुटखा आढळला. पोलिसांनी तो जप्त करुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणला.नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे हेही पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नगरमधून गुटख्याची राजरोसपणे तस्करी होते, हे या कारवाईमुळे सिद्ध झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगितले जात आहे. गुटख्याच्या तपासणीसाठी पोलिसांनी अन्न औषध विभागालाही पाचारण केले. अन्न औषधचे निरीक्षक किशोर बावीस्कर भाेसले रात्री उशिरापर्यंत पंचनामा करत होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...