आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाअभावी धरणांतील पाण्याचे साठे "जैसे थे'च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मोठ्याखंडानंतर गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, लाभक्षेत्रात बरसणाऱ्या पावसाने पाणलोट क्षेत्रात दडी मारल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठे जैसे थे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुळा धरणात ४०, तर भंडारदरा धरणात ३० टक्के कमी पाणीसाठा आहे.

जूनच्या मध्यात आलेल्या दोन-तीन जोरदार पावसांनंतर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली. पावसात मोठा खंड पडल्याने खरिपाची बहुतांश पेरणी वाया गेली. गेल्या पाच दिवसांपासून अकोले तालुका वगळता जिल्ह्यात सर्वदूर बऱ्यापैकी पाऊस होत आहे. यातून किमान पिण्याच्या पाण्याची चाऱ्याच्या टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी जिल्हाभरात पावसाने दडी मारली असताना अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू होता. मात्र, या पावसामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. इतर १३ तालुक्यांमध्ये पावसाने ३० टक्क्यांची सरासरी ओलांडण्यापूर्वीच अकोले तालुक्यातील पावसाने वर्षभराची शंभर टक्के सरासरी ओलांडली होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून अकोले तालुक्यात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे तालुक्याची सरासरी ११२ टक्क्यांवरच थांबली आहे.

गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसात सातत्य होते. याच कालावधीत गेल्या वर्षी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ६९ टक्के पाऊस झाला होता. यंदा अजूनही सरासरीची आकडेवारी ४२ टक्क्यांच्या घरातच रेंगाळली आहे. गेल्या वर्षी एकूण सरासरीच्या केवळ ७७ टक्के पाऊस झाला होता. यंदाही पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत वर्षभराच्या एकूण सरासरीच्या दहा टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. परिणामी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत जिवंत होण्यास हिरवा चारा उपलब्ध होण्यास या पावसाची मदत मिळणार आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला या पावसाचा थोडासा का होईना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामातील पेरण्यांना अजून कालावधी आहे. पावसात सातत्य राहिल्यास रब्बी हंगामाच्या आशा जिवंत राहणार असून जिल्ह्यात खरिपाच्या तुलनेत रब्बीचे लागवड क्षेत्र अधिक आहे.
पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पाथर्डी तालुक्यात होता. २० टक्क्यांच्या आत असलेला पाथर्डी तालुक्यातील सरासरी पाऊस ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. कर्जत तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कर्जतमध्ये जिल्ह्यातील सर्वात कमी सरासरी २१ टक्के पाऊस झाला आहे.

आवर्तनामुळे घट
भंडारदराधरणातून सध्या खरीप पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू अाहे. त्यामुळे ८० टक्क्यांच्या जवळपास पोहोचलेला धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांच्या घरात आला आहे. मुळा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठाही ५२ टक्क्यांच्या घरातच आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धरणांतील पाणीसाठा