आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट बैलाच्या हल्ल्यात 11 जखमी, महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोकाट कुत्रे जनावरांमुळे नगरकर अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. कुत्र्यांपाठोपाठ आता मोकाट जनावरांची शहरात दहशत वाढली आहे. माळीवाडा परिसरातील कोहिनूर गार्डन अपार्टमेंटजवळ एका बैलाने सोमवारी दिवसभर धुमाकूळ घातला. बैलाने तब्बल १४ जणांना आपल्या शिंगावर घेतले. त्यात ११ जण जखमी झाले असून जणांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा थरार सुरू होता. यानिमित्ताने महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 
 
सकाळी ११ ची वेळ एक मोकाट बैल कोहिनूर अपार्टमेंटमध्ये शिरला. पुन्हा बाहेर येऊन शेजारीच असलेल्या पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये शिरला. नंतर या बैलाने पुन्हा आपला मोर्चा अपार्टमेंटकडे वळवला. सुरूवातीला अपार्टमेंट परिसरातील तीन-चार जणांना त्याने आपल्या शिंगावर घेत जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांची पळापळ सुरू झाली. काय करावे, कुणालाच काही सूचेना. परिसरातील जागरूक नागरिक अमित बोरा यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोनवरून या घटनेची माहिती दिली. मात्र, हे आपले कामच नाही, असे सांगत या विभागाने आपली जबाबदारी झटकली. 
 
तिकडे महापालिकेची यंत्रणा आपली जबाबदारी झटकत होती, तर इकडे बैलाचा धुमाकूळ सुरूच होता. परिसरातील नागरिकांची पळापळ सुरूच होती. बैल शांत राहण्यास तयार नव्हता. अखेर बोरा यांनी आमदार संग्राम जगताप यांनाच फोनवरून सर्व माहिती दिली. जगताप यांनी बोरा यांना उपायुक्त चव्हाण यांचा फोन नंबर दिला. ते स्वत: चव्हाण यांच्याशी बोलले. बोरा यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपायुक्त चव्हाण यांना या प्रकाराची माहिती दिली. चव्हाण यांनी तातडीने दखल घेत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत या बैलाने तब्बल ११ जणांना जखमी केले होते. काहींना हातापायाला दुखापत झाली, तर काहीजणांचे हातपाय मोडले. सायंकाळी चार वाजता अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नांनी बैलाला पकडण्यासाठी कसरत सुरू झाली. त्यात अग्निशमन विभागाचे तीन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास या बैलाला पकडण्यात यश आले. 
 
विद्यार्थी बचावले 
कोहिनूर अपार्टमेंट परिसरात बैलाचा धुमाकूळ सुरू होता. बैलाने शेजारीच असलेल्या पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये दोन वेळा फेरफटका मारला. शाळा सुटण्याची वेळ झाली होती, तरी बैलाचा धुमाकूळ सुरूच होता. हा बैल शाळा सुटल्यानंतर मुलांच्या घोळक्यात शिरला असता, तर शेकडो विद्यार्थी जखमी झाले असते. परंतु सुदैवाने बैलाला पकडण्यात वेळीच यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 
 
बैल अपार्टमेंटमध्ये 
बैलाने दिवसभर धुमाकूळ घालत ११ जणांना जखमी केले. परंतु महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी इकडे फिरकला नाही. सकाळी फोन करून घटनेची माहिती देऊनही अग्निशमन विभागाचे कर्मचारी वाजता आले. मनपाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाला. बैलाची दुसरीकडे व्यवस्था करण्याऐवजी मनपाने हा बैल अपार्टमेंटमध्ये बांधून ठेवला आहे. - अमित बोरा, जागरूक नागरिक. 
बातम्या आणखी आहेत...