आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपंचायतीला मूठमाती अभियानाला देणार गती, बहिष्कृतते कायदा संमत करण्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जग एकविसाच्या शतकात वाटचाल करत असताना जातींचा पगडा काही केल्या सुटायला तयार नाही. पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर गावात सप्टेंबरमध्ये तिरमली समाजाची जातपंचायत भरली होती. संवेदनशील प्रकरणांचा न्यायनिवडा करण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ही जातपंचायत बंद पडली. त्याच पंचांवर आता संगमनेरमध्ये खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर जातपंचायतील मूठमाती देण्याचे अभियान अधिक जाेमाने राबवण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला आहे.
टाकळी मानूर येथून दीड किलोमीटर अंतरावर अंबिकानगर आहे. तेथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जातपंचायत भरली होती. विविध जिल्ह्यांतील कौटुंबिक कलह, पती-पत्नींमधील वाद, भाऊबंदकीची प्रकरणे न्यायनिवाड्यासाठी होती. जातीबाहेर काढलेल्या व्यक्तींना पुन्हा जातीत घेण्यासाठी पंचांकडून लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आली. एकूण १० पंचांसमोर न्यायनिवाडा होणार होता. पाथर्डी पोलिसांना याची कुणकुण लागल्याने त्यांनी अंबिकानगर गाठले. त्यामुळे पंचांना गाशा गुंडाळावा लागला.
तिरमली समाजाची जातपंचायत वर्षातून एकदाच न्यायनिवाडा करते. वीस वर्षांपूर्वी घोडेगाव (ता. नेवासे) येथे ही जातपंचायत बसली होती. मात्र, प्रचंड वादावादी होऊन धारदार शस्त्रांनी हाणामाऱ्या झाल्या. त्यानंतर काही वर्षे ही जातपंचायत भरलीच नाही. नंतर काही पंचांनी एकत्र येत इतरत्र जातपंचायत भरवायला सुरुवात केली. सध्या पंचायतीत १० पंचांचा समावेश आहे. ते कुकाणे (ता. नेवासे), टाकळी मानूर, धनगरवाडी (ता. नगर), आष्टी तालुक्यातील दैठणे, धामणगाव, ढोकराई (दौंड) पाथरवाला (ता. शेवगाव) येथील आहेत. टाकळी मानूरची जातपंचायत ऐनवेळी गुंडाळावी लागल्यामुळे पंचांनी नगर जिल्ह्यातून आपले बस्तान गुंडाळले. त्यांनी नगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या एका खेड्यात जातपंचायत भरवली. मात्र,त्याचीही कुणकुण बीड पोलिसांना लागली. त्यामुळे तेथील जातपंचायतही पंचांना गुंडाळावी लागली. दरम्यान, जातीतून बाहेर हाकलेल्या काही पीडित लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. रंजना गवांदे यांच्याकडे धाव घेत मदतीची याचना केली. त्यांनी पीडितांचे म्हणणे ऐकून घेत तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले. अंनिस अन्य काही संघटनांनी जातपंचायतींविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेने जिल्ह्यातील अनेकांना दिलासा
मिळाला आहे.
अंनिस पोलिस अधिकाऱ्यांचा आधार
जातीतून बहिष्कृत करून पुन्हा जातीत घेण्यासाठी २७ लाखांची खंडणी मागणाऱ्या पंचांविरुद्ध संगमनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पीडित कुटुंबांना अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष रंजना गवांदे संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय देवरे यांनी मानसिक आधार दिला. उपअधीक्षक देवरे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक गोकूळ औताडे यांनी पीडित युवकाची फिर्याद नोंदवून घेतली. गंगाराम व्यंकट मल्ले (श्रीगोंदे) रामा ऊर्फ रामदास साहेबराव फुलमाळी (जुन्नर) अशी आरोपींची नावे आहेत.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
गंगाराम व्यंकट मल्ले (श्रीगोंदे) रामा ऊर्फ रामदास साहेबराव फुलमाळी (जुन्नर) या दोन पंचांना पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकिलांनी गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ती मान्य करत न्यायालयाने आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास संगमनेर पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातही या पंचांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. केंद्राची संमती कधी मिळणार?
-टाकळीमानूरलातिरमली समाजाची जातपंचायत भरल्याची माहिती मिळाली होती. आम्ही घटनास्थळी जाण्यापूर्वीच पोलिस तेथे आल्याने जमाव पांगला. पुरोगामी महाराष्ट्रात जातपंचायती भरणे ही शरमेची बाब आहे. जातपंचायती बरखास्त व्हाव्या, म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील असून जातपंचायतींना मूठमाती
देण्याचे अभियान राबवत आहे. त्यादृष्टीने जातपंचायतीच्या संबंधित बहिष्कृततेच्या विरोधातील कायदा केंद्राकडे संमतीसाठी पाठवलेला आहे. तो संमत होण्याची नितांत गरज आहे.''
अॅड.रंजना गवांदे, जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस.
बातम्या आणखी आहेत...