आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई-घोडेगाव रस्त्यावर देशी दारुसह इंडिका जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशी दारुची वाहतूक करणारी इंडिका कार शुक्रवारी सोनई - घोडेगाव रस्त्यार जप्त करण्यात आली. - Divya Marathi
देशी दारुची वाहतूक करणारी इंडिका कार शुक्रवारी सोनई - घोडेगाव रस्त्यार जप्त करण्यात आली.
नगर- नेवासे तालुक्यातील सोनई-घोडेगाव रस्त्यावर इंडिका कारमध्ये ठेवलेली देशी दारु राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. श्रीरामपूरच्या विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव-खेतमाळीस यांच्या पथकाने ही कामगिरी केली. कारवाईत एकूण लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
सोनई ते घोडेगाव रस्त्याने इंडिका कारमधून देशी दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक जाधव यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक जी. व्ही. बारगजे, निरीक्षक डी. बी. लगड, एस. आर. कुसळे, व्ही. बी. कंठाळे यांनी सोनई-घोडेगाव रस्त्यावर सापळा लावला. इंडिका कार थांबवून त्यांनी मुद्देमाल जप्त केला.बॉबी संत्रा कंपनीची देशी दारु, टॅगो पंच, भिंगरी संत्राच्या १८० मिलीमीटरच्या हजार १०४ सीलबंद बाटल्या, मद्य वाहतूक करणारी कार (एमएच १७ अेअे ७२) जप्त करण्यात आली आहे. अवैध दारुविक्रीविरुद्ध सुरु असलेली माेहीम यापुढेही सातत्याने सुरूच राहिल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्य उत्पादन शुल्क विभगाने मार्चमध्ये जिल्ह्यात अवैध दारुविक्रीचे एकूण २२१ गुन्हे नोंदवले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...