आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान धामणे यांना वीरमरण, हेलिकॉप्टर अपघातात जखमी झाल्यानंतर १३ दिवस दिली मृत्यूशी झुंज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी - नगरतालुक्यातील सारोळा कासार येथील लष्करी जवान योगेश भास्कर धामणे यांना देशसेवा करताना वीरमरण आले.
पश्चिम बंगालमधील सुकना येथे ३० नोव्हेंबरला लष्काराचे चीता चॉपर क्रॅश झाल्याने लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. धामणे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्कराच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. गेले १३ दिवस ते कोमात होते. रविवारी (११ डिसेंबर) सायंकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

अवघे ३४ वर्षे वय असलेल्या योगेश यांच्यामागे पत्नी, वर्षांच्या दोन मुली, विधवा आई, शेतकरी असलेला भाऊ आणि एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

योगेश फेब्रुवारी २००३ मध्ये पुण्यातील खडकी येथे बाॅम्बे इंजिनियरींग युनिटमध्ये भरती झाले होते. सध्या ते नाॅर्थ सिक्किममध्ये तैनात होते. लष्करी अधिकाऱ्यांसमवेत ३० नोव्हेंबरला पश्चिम बंगालमधील सुकना या लष्करी केंद्राकडे येत असताना हेलिकाॅप्टर कोसळले. यामध्ये अधिकारी जागीच ठार झाले, तर योगेश गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना ११ डिसेंबरला सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सोमवारी (१२ डिसेंबर) दुपारी जाहीर केले. हे कळताच सारोळा कासार परिसरावर शोककळा पसरली.

उद्या होणार अंत्यसंस्कार
शहीद योगेश धामणे यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने बुधवारी (१४ डिसेंबर) रात्री कोलकत्याहून रवाना केले जाईल. गुरूवारी (१५ डिसेंबर) सकाळी वाजता ते पुणे विमानतळावर येईल. तेथे लष्कराच्या मानवंदनेनंतर पार्थित सारोळ्याकडे रवाना होईल. दुपारी सारोळा कासार येथे अंत्यसंस्कार केले जातील.

तिसऱ्या जवानाला आले वीरमरण
सारोळ्याच्या जवानांना यापूर्वी वीरमरण आले आहे. सरपंच रवींद्र कडूस यांचे चुलत बंधू सीआरपीएफचे जवान मिठू गिताराम कडुस हे आसाममध्ये अतिरेक्यांशी लढताना १४ जुलै २००१ रोजी शहीद झाले. १८ जुलै २०१० रोजी राहुल बबन कडूसला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आले. आता योगेश धामणे हे देशासाठी शहीद झाले.
बातम्या आणखी आहेत...