आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचा ध्वज जाळून केला निषेध,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हल्ला केला. यात काही जवान शहीद झाले, तर काही जखमी झाले. पाकिस्तानच्या या हल्ल्यास भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या भ्याड हल्ल्याचा निषेध नगरमध्ये करण्यात आला. डीएसपी चौकाजवळील विराज कॉलनीमध्ये सर्वपक्षीय मित्रमंडळाच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. याप्रसंगी भाजपचे सुनील काळे, काँग्रेसचे उबेद शेख, शिवसेनेचे अंबादास पंधाडे, आनंद पुंड, मनेष साठे, अविनाश शिंदे, रणजित परदेशी, श्रीरंग रोहोकले, भरत जाखोटिया, राजू कचरे आदी उपस्थित होते.

निषेध करताना काळे म्हणाले, पाकिस्तान नेहमीच भारतावर अशा पद्धतीचा भ्याड हल्ला करतो. भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करून काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांना पाकिस्तान खतपाणी घालत आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. उबेद शेख यांनी भारतमातेचा जयजयकार करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानच्या ध्वजाला आग लावली.

भारतीय सीमेवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विराज कॉलनीत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...