आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलॉसॉफी ऑलिम्पियाडसाठी नीहार इस्टोनियाला, जगातील 40 देशांमधील 90 स्पर्धकांचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुढील आठवड्यात युरोपमधील इस्टोनिया येथे होणाऱ्या तेविसाव्या फिलॉसॉफी ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीसाठी नगरची नीहार कुलकर्णी १३ तारखेला रवाना होत आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी नीहारच्या रूपाने नगरला प्रथमच मिळाली आहे. या फेरीत ४० देशांतील ९० स्पर्धक सहभागी होतील.
आठवी-नववीत असताना नीहारने फिलॉसॉफी ऑलिम्पियाडची प्राथमिक परीक्षा दिली. त्यात तिला यश आले नाही, पण त्यामुळे निराश होता तिने पुढील वर्षी जोमाने तयारी केली. दहावीचा अभ्यास सांभाळून तिने परीक्षा दिली. या वेळी ती देशात दुसरी आली. मागील वर्षी झालेल्या परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान नीहारने पटकावला. २०१५ च्या प्रारंभी घेण्यात आलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धेतही नीहार पहिली आली. त्यामुळे तिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. भारतातून नीहार अभिषेक देढे या दोघांची निवड झाली आहे.
स्नेहालयाचे डॉ. गिरीश डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांची नीहार मुलगी, तर मेजर प्रा. दिनूभाऊ शोभा कुलकर्णी यांची नात आहे. सध्या ती नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयात बारावीत शिकते आहे. मागील दोन वर्षांपासून ती या परीक्षेची तयारी करत असून तिला केदार सोनी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. फिलॉसॉफी ऑलिम्पियाडची अंतिम फेरी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. यावर्षी ही फेरी युरोपमधील इस्टोनिया येथे १४ ते १८ मेदरम्यान होत आहे. १५ ला निबंध लेखनाची परीक्षा आहे. ऐनवेळी देण्यात आलेल्या विषयावर हा निबंध चार तासांत लिहायचा आहे. ज्युरींचे मंडळ हे निबंध तपासतील. नंतर पुढील फेरी होईल. त्यातून अंतिम तिघांची निवड युनेस्कोचे परीक्षक करतील. या स्पर्धेत ४० देशांतील ९० स्पर्धक सहभागी होणार आहेत. येत्या बुधवारी (१३ मे) नीहार इस्टोनियासाठी रवाना होईल.

रोज १७ तास अभ्यास
फिलॉसॉफी ऑलिम्पियाडचे आयोजन युनेस्कोच्या वतीने केले जाते. त्यासाठी विशिष्ट असा सिलॅबस किंवा पुस्तके नाहीत. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी अक्षरश: शेकडो ग्रंथ अभ्यासावे लागतात. विश्लेषणाची क्षमता याला विशेष महत्त्व दिले जाते. फिलॉसॉफी ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत बाजी मारण्यासाठी नीहार गेले काही दिवस दररोज सतरा तास अभ्यास करत आहे.
बातम्या आणखी आहेत...