आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅट्रॉसिटी’चा गैरवापर अयोग्य : नीलम गोऱ्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्ह्यासह राज्यभर महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. पाथर्डी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. संबंधित आरोपीने पीडित मुलीच्या कुटुंबाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे ही चुकीची प्रवृत्ती आहे. अॅट्रॉसिटी कायद्याचा असा गैरवापर करणे योग्य नाही, असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
डॉ. गोऱ्हे यांनी पाथर्डीतल अत्याचारित मुलीची भेट घेतली. नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी महापौर सुरेखा कदम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, गतिमंद अशा मुलींवर अत्याचार झाल्यानंतर साक्षी-पुरावे तपासण्यासाठी पोलिसांनी अधिक काम करणे गरजेचे आहे. पाथर्डी येथील अत्याचारित गतिमंद मुलगी निरागस, अशक्त कुपोषित आहे. तिला योग्य निगराणीची गरज आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा केली आहे. अत्याचारित मुलींना तेच तेच प्रश्न विचारले जाऊ नयेत, याची काळजी यंत्रणांनी घेतली पाहिजे. गुन्हे घडू नयेत, यासाठी संबंधित पोलिसांनी गावागावांत ग्रामरक्षक दल तयार केले पाहिजेत. मनोधैर्य योजनेचा निधी संबंधितांपर्यंत पोहचत नाही, त्यासाठी प्रत्येक आठवड्याला बैठक घेतली पाहिजे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...