आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलम गोऱ्हे यांची कोपर्डी गावाला भेट, निर्भयाच्या कुटुंबीयांना दिला आधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोपर्डी येथील निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गोऱ्हे यांनी शिक्षेबद्दल समाधान व्यक्त करीत निर्भयाच्या कुटुंबीयांना आधार दिला. 

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कर्जत तालुक्यातील निर्भयाच्या कुळधरण येथील नूतन मराठी विद्यालयास भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी आकांक्षा गुंड, पूजा गायकवाड, वृषाली भवाळ, शीतल गुंड, पूर्वा गरुड आदी विद्यार्थिनींनी विविध प्रश्न मांडत चर्चा केली. यावेळी प्राचार्य सूर्यभान सुद्रिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजूषा गुंड, संस्थेचे सचिव महेंद्र गुंड, पर्यवेक्षक भागवत घालमे, शरद जगताप, संजय तुरकुंडे, सीताराम सटाले, बारीकराव शिंदे, सुभाष सुपेकर आदी उपस्थित होते. यानंतर गोऱ्हे यांनी सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विश्वस्तांसोबत चर्चा करून तेथील विकासकामांचा आढावाही घेतला. 

बातम्या आणखी आहेत...