आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडे आज भरणार; जायकवाडीत विसर्ग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारदरा - भंडारदरा धरणातील अतिरिक्त पाण्यावर निळवंडे धरण दुसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने भरणार आहे. निळवंडेची क्षमता 5 हजार 220 दशलक्ष घनफूट असून बुधवारी सकाळपर्यंत पाणीसाठा 5 हजार 167 दशलक्ष घनफूट झाला होता. धरण शंभर टक्के भरण्यासाठी अजून 53 दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असून गुरुवारी (10 ऑक्टोबर) पर्यंत हे धरण भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर जायकवाडी धरणासाठी पाणी सोडले जाणार आहे. त्यातून किमान एक ते दीड टीएमसी पाणी जायकवाडीला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 22 हजार 119 दलघफू पाणीसाठा आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण भरले आहे. निळवंडे धरणात सध्या 200 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी (10 ऑक्टोबर) हे धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. भंडारदरा धरणात 11 हजार 39 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. मागील महिन्यात भंडारदरा, निळवंडे व कृष्णावंती नदीचे अतिरिक्त 4 हजार 500 दशलक्ष घनफूट (साडेचार टीएमसी) पाणी ओझर बंधार्‍याद्वारे जायकवाडी धरणात गेले. परंतु प्रत्यक्षात जायकवाडीत तीन टीएमसी पाणी पोहोचले.

त्यानंतर परतीच्या पावसाने निळवंडे धरण पूर्णपणे भरण्याच्या वाटेवर आहे. या धरणातील पाणीसाठा 99 टक्के झाला आहे. जायकवाडीकडे निळवंडे धरणातून मुळा नदीचा विसर्ग कोतूळ येथून 503 क्युसेक्सने सुरू आहे. निळवंडे धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जायकवाडीकडे जाणार आहे.