आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडेचे पाणी गरजेनुसार प्रवरा कालव्यांना सोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - नगर जिल्ह्यातील निळवंडेतून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी प्रवरा नदीसह डाव्या व उजव्या कालव्यामध्ये गरज भासेल त्या पद्धतीने सम प्रमाणात सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला दिले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे साखर कारखान्याच्या वतीने दाखल जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या स्वतंत्र अर्जाच्या सुनावणीनंतर निळवंडे धरणातील पाण्यासंदर्भात केलेल्या सूचनांची अंमलबजावणीही पुढील सुनावणीपूर्वी करण्यास न्यायालयाने राज्य शासन व जलसंपदा विभागाला सांगितले आहे. दोन्ही कालव्यांतून समान पाणी सोडण्याची मागणी कारखान्याने केली होती.