आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nimbalaka Rail Flyovers Will Begin Within A Week

निंबळक रेल्वे उड्डाणपूल आठवडाभरात सुरू होणार-चाचणीनंतर होणार उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक येथे उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
खासदार दिलीप गांधी यांनी बुधवारी या पुलाची पाहणी करून अधिकार्‍यांना काही सूचना केल्या. यावेळी सेंट्रल रेल्वेचे उपमुख्य अभियंता प्रदीप पोळ, अतिरिक्त अभियंता एस. सुरेश, सुधीर मेहता, बाळासाहेब पोटघन, श्याम पिंपळे, किशोर बोरा, गोपाळ वर्मा, केदार लाहोटी, नितीन शेलार आदींसह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गांधी म्हणाले, केंद्र सरकारचा 50 टक्के सहभाग असलेल्या निधीतून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. बाह्यवळण रस्त्यामुळे नगर शहरातील अवजड वाहतूक कमी होणार आहे. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. हा पूल झाल्यामुळे नगर शहराच्या विकासाला चालना मिळेल. ज्या भागातील रस्ते व पूल उत्तम, तो भाग लवकर विकसित होतो. उड्डाणपुलामुळे बाहेरून येणार्‍या गाड्यांचा वेळ व इंधन वाचणार आहे. अभियंता पोळ म्हणाले, लवकरच या पुलाची चाचणी घेऊन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.