आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीन आगे खूनप्रकरणातील 10 आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खूनप्रकरणातील 10 आरोपींची पुराव्या अभावी जिल्हा व सत्र कोर्टाने बुधवारी निर्दोष सुटका केली. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आरोपी होते, त्यांची यापूर्वीच सुटका झाली आहे.

 

28 एप्रिल 2014 रोजी नितीन राजू आगे याचा खून झाला होती. नितीन हा गावातील शाळेत 12 वीत शिकत होता. प्रेमप्रकरणातील नितीन आगे याला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन तेथे अमानुष मारहाण केली होती. तसेच डोंगरातील झाडाला त्याला गळफास दिला होता, अशी फिर्याद जामखेड पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. गावातील आरोपी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, निलेश गोलेकर, विनोद अभिन्यू गटकळ, भूजंग सुर्यभान गोलेकरसह 13 जणांविरुद्ध खून करणे, तसेच अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. राज्यभरात खर्डा येथील हत्या प्रकरण गाजले होते. या प्रकरणी दलित संघटनांना आक्रमक झाल्या होत्या. या खटल्यात सव्वीस साक्षीदार होते.

बातम्या आणखी आहेत...