आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मग नितीनला काेणी मारलं? सत्र न्यायालयाच्या निकालानंतर मातापित्याचा आर्त सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- फितूर साक्षीदारांमुळे आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने खर्डा (ता. जामखेड) हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या खटल्यातील २६ पैकी तपासी अधिकारी, इतर पोलिस व सरकारी साक्षीदार वगळता सर्वजण फितूर झाले. भर दिवसा क्रूर पद्धतीने एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले होते. आता मात्र खटल्याच्या निकालामुळे समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. ‘सामना’ चित्रपटातल्या ‘मारुती कांबळेचं झालं?’ हा प्रश्न जसा अनुत्तरित राहिला. अगदी तसाच ‘माझ्या नितीनचं काय झालं?’  असा आर्त सवाल नितीनच्या अाई- वडिलांनी उपस्थित केला अाहे.


खर्ड्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गात घुसून २८ एप्रिल २०१४ रोजी टोळक्याने नितीनला बेदम मारहाण केली. तेथून गावातील मंदिराजवळ नेऊन त्याला पुन्हा बेदम मारले. गळ्याभोवती दोरी आवळून त्याचा खून केला. कान्होबाच्या मंदिराजवळच्या एका झाडाला त्याला लटकावले. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली हाेती. या खटल्यात तीन आरोपी अल्पवयीन हाेते, पैकी एक नंतर मृत झाला हाेता. दरम्यान, साक्षीदार फितूर झाल्यामुळे काेर्टाने सर्व अाराेपींची गुरुवारी निर्दाेष सुटका केली हाेती. 


शाळेचे शिक्षक बाळू जोरे, शिक्षिका साधना फडतरे, शिपाई विष्णू जोरे, सदाशिव डाडर हे साक्षीदार होते. त्यांनी नितीनला आराेपींनी वर्गात घुसून मारहाण करुन मोटारसायकलवर बसून नेल्याचे जबाबात म्हटले होते. न्यायालयात मात्र त्यांनी नितीनला ओळखत नसल्याचे,  पोलिसांनी धमकावून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचे सांगितले हाेेते. 

 

पैसे देवून फोडले सर्व साक्षीदार

 

सर्व आरोपी निर्दोष असतील, तर नितीनचा खून कोणी केला? मग खरे आरोपी कोण आहेत? या प्रकरणी पुर्नतपास करुन अाम्हाला न्याय द्यावा. सर्व साक्षीदार पैसे देवून फोडले. खटला जलदगती न्यायालयात चालला नाही. अामच्या कुटुंबात एकाला शासकीय नोकरी देऊ, जमीन देऊ, अशी फसवी आश्वासने सरकारने दिली. अाता पोटच्या गोळ्याला न्याय मिळण्यासाठी अाम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू.

- रेखा व राजू आगे, मृत नितीनचे आई-वडील

 

हायकोर्टात जाणार
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्यामुळे खर्डा खटल्यात आरोपी निर्दाेष सुटले. मात्र आता उच्च न्यायालयात आव्हान दाद मागू. फितूर साक्षीदारांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. पोलिसांनी त्यासाठी सहकार्य केले तर साक्षीदारांवर कारवाई होऊ शकते. फितूर साक्षीदारांवर काय कारवाई करायची, हे मात्र न्यायालयच ठरवते.
- अॅड. रामदास गवळी, सरकारी वकील

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, नेमके काय होते प्रकरण?

 

बातम्या आणखी आहेत...