आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, Union Transport Minister, Divya Marathi

खड्डे पडल्यास त्याच खड्ड्यांत बुलडोझरने गाडू, कंत्राटदारांना गडकरींचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्‍ट्रीय महामार्गाचे काम प्रामाणिकपणे करा. दर्जाशी कुठलीही तडजोड चालणार नाही. कामात भ्रष्टाचार करू नका; रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याच खड्ड्यांत गाडून बुलडोझर फिरवू, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिला.

कल्याण-विशाखापट्टणम या 222 क्रमांकाच्या राष्‍ट्रीय महामार्गावरील अणे घाट ते नगर बायपास रस्त्याच्या दुपदरीकरण फेरस्थापना व दर्जा उन्नतीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी गडकरी बोलत होते. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सोमवारी हा कार्यक्रम झाला. पक्षाचे सरचिटणीस श्याम जाजू, खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले, विजय औटी उपस्थित होते.

कामात पारदर्शकता ठेवा. कंत्राटदार, अधिकारी, वरिष्ठ यंत्रणा यांची नावे व संपर्क क्रमांक याची माहिती कामाच्या ठिकाणी लावा. गैरव्यवहार न करता काम करा, असा इशारा त्यांनी दिला.
गडकरी म्हणाले, सर्वच रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रिटीकरणातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सिमेंट कंपन्यांनी गोणीमागे 25 रुपयांपर्यंत वाढ केली. सिमेंट उत्पादकांना चर्चेसाठी बोलावले. त्यांना भूमिका समजावून सांगितल्यानंतर रस्त्याच्या कामांसाठी 150 ते 160 रुपयांत सिमेंटची गोणी पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या किमतीत सिमेंट मिळाल्यास डांबरी रस्त्यापेक्षा 25 ते 30 टक्क्याने सिमेंटचे रस्ते स्वस्त तर होतीलच, शिवाय हे रस्ते किमान 50 वर्षे टिकतील.

सरकार व मंत्र्यांच्या भरवशावर राहू नका
सरकार व मंत्र्यांच्या भरवशावर राहू नका, असा अजब सल्ला गडकरी यांनी दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सद्गुरू वामनराव पै यांचा संदर्भ देत ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तत्त्व अनुसरण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: कधीही सरकारच्या भरवशावर राहिलो नाही, असे सांगताना गडकरी यांनी मंत्री म्हणून हे बोलणे चुकीचे असल्याची कबुलीही दिली.