आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साठे मृत्यूप्रकरण पोलिसांना भोवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नितीन बाळू साठे (२२, जवळा, ता. पारनेर) याच्या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिस खाते कोंडीत सापडले आहे. दलित संघटना आक्रमक झाल्यामुळे याप्रकरणी एका उपनिरीक्षकासह पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आले. मात्र, दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत नितीनचा अंत्यविधी करण्याचा पवित्रा संघटनांनी घेतला. शिवाय गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानासमोर अथवा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अंत्यविधी करु, असाही इशारा देण्यात आला. त्यामुळे पोलिसांवर दिवसभर प्रचंड तणाव होता. तथापि, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी नितीनच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी उशिरा जवळा येथे नितीनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोतवाली पोलिसांनी बुधवारी पहाटे नितीनला संशयित म्हणून ताब्यात घेतले. दिवसभर त्याची कसून चौकशी केली. सायंकाळी पोलिसांची नजर चुकवून नितीनने विवस्त्रावस्थेत पोलिस ठाण्यातून धूम ठोकली. त्याला पाहून रस्त्यावरच्या नागरिकांनी आरडाओरडा केला. ही बाब समजताच कोतवाली पोलिसांनी पाठलाग करुन नितीनला पकडले. रात्री सव्वा ते साडेआठच्या सुमारास नितीनला चक्कर आली. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, अत्यवस्थ झाल्यामुळे नितीनला नंतर नोबल या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात आले. बुधवारी रात्रभर गुरुवारी दुपारपर्यंत त्याला कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले होते.
गुरुवारी दुपारी डॉ. बापू कांडेकर यांनी नितीनला मृत घोषित केले. तोपर्यंत नितीनचे मामा बाळू सिताराम साळवे, त्याचा भाऊ भावजय रुग्णालयात आले. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच नितीनचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला. हा प्रकार समजल्यावर रिपाइंचे राज्य सचिव अशोक गायकवाड, अजय साळवे, सुनील शिंदे, अनंत लोखंडे आदी दलित संघटनांचे पदाधिकारी रुग्णालयात आले. त्यांनीही नितीनच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांवर आरोप केले. कोतवाली पोलिसांनी सायंकाळी नितीनचा अकस्मात मृत्यू झाल्याची नाेंद केली. नंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा होऊन नितीनचा मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तोपर्यंत सीआयडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली.

पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
शुक्रवारी सकाळी रिपाइंचे राज्य सचिव अशोक गायकवाड, अजय साळवे, सुनील शिंदे अनंत लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर आरोप केले. जिल्ह्यात दलितांवर अत्याचार वाढल्याचे सांगत पोलिस गृहराज्यमंत्री राम शिंदे संवेदनशील नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. नितीनला ताब्यात घेतल्यापासून त्याला रुग्णालयात मृत घोषित करेपर्यंतचा घटनाक्रम संशयास्पद आहे. नितीनच्या मृत्यूमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. पोलिसांनी नितीनला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. पोलिसांची गुन्हेगारांची सांगड असल्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, असा आरोपही करण्यात आला. पोलिसांच्या मारहाणीमुळेच िनतीनचा मृत्यू झाला असून याप्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, निष्काळजीपणामुळे "ताठे'चा झाला "साठे'...मंत्र्यांच्या घरासमोर अंत्यविधी...
बातम्या आणखी आहेत...