आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन साठे मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू, कुटुंबीयांचे जबाब घेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नितीन साठे मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला शुक्रवारपासून सुरुवात झाली अाहे. या प्रकरणी साठे कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आल्याचे समजते. कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असताना २८ मे रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान नितीनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तीन यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नगरचे प्रांताधिकारी वामन कदम यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची कदम यांनी चौकशी सुरू केली अाहे. पोलिस ठाण्यातील कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, खासगी हॉस्पिटलमधील संबंधितांचे जबाब कदम यांनी घेतल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...