आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला ठेंगा ! कृषी गुंतवणूक नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विदर्भ, तसेच नाशिक जिल्ह्यात कृषी क्षेत्रात विविध कंपन्या ३०० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. मात्र, खुद्द कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांच्या नगर जिल्ह्यात एकही कंपनी गुंतवणूक करण्यास तयार नाही.

नगर हा राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा िजल्हा आहे. सहकारी साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय यावर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी अवलंबून आहेत.जिल्ह्यात उसाबरोबर कापूस, सोयाबीन व फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जिल्ह्यात नगर, सुपा व पांढरीपूल या तीन प्रमुख आैद्योगिक वसाहती आहेत. त्यातील बहुतांशी उद्योग हे शेतीची निगडित आहेत.
नगर िजल्ह्याला गेल्या पंधरा वर्षांत बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण िवखे यांच्या रुपाने दोन वेळा कृषिमंत्री पद िमळाले. आता भाजपच्या काळातही राज्याचे कृषी राज्यमंत्री राम िशंदे हे नगर िजल्ह्याचे आहेत. आघाडीच्या काळात जसे िजल्ह्याला कृषी क्षेत्रात समाधानकारक असे काही िमळाले नाही, तसेच भाजपच्या काळात घडते आहे. मागील शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी पणन राज्यमंत्री राम िशंदे यांच्या उपस्थितीत कृषी, व्यापार व उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींची बैठक झाली. आगामी काळात राज्यात कृषी क्षेत्रात विविध कंपन्या ३०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. िवदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक िजल्ह्यात ही गुंतवणूक केली जाणार आहे. मात्र, कृषी राज्यमंत्री िशंदे हे ज्या नगर िजल्ह्याचे आहेत, तेथे कृषी क्षेत्रात कुठलीही गुंतवणूक होणार नाही.
टोमॅटो उत्पादन नगरला, प्रकल्प नाशिकला...
नगर िजल्ह्यातील अकोले, संगमनेर व कोपरगाव हे तालुके बागायती आहेत. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले जाते. या तिन्ही तालुक्यांना नाशिक जवळ अाहे. त्यामुळे शेतकरी टोमॅटोची िवक्री थेट नाशिकला करतात. नंतर नाशिकमधून हे टोमॅटो मुंबईला जातात. दरवर्षी या तीन तालुक्यांमधून कोट्यवधींची उलाढाल होते. टोमॅटोचे पीक नगर िजल्ह्यात घेतले जात असले, तरी टोमॅटो प्रक्रिया उद्योगाची गुंतवणूक नाशिक िजल्ह्यात होणार आहे.
कृषी क्षेत्रातील
गुंतवणूक वाढेल
कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, या हेतूने मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन गुंतवणूकदारांशी चर्चा केली. रुची सोया कंपनी िवदर्भात सोयाबीन प्रकल्प उभाणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर नाशिकमध्ये टाेमॅटो उद्योगात गुंतवणूक करेल. तसा सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्र्यांनी कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर निश्चित भर िदला जाईल.
विकास देशमुख, कृषी आयुक्त.