आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तर तंबाखुचे नावही नको - दिलीप गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्र राज्य सरकार तंबाखुमुळे कर्करोग होतो,अशा आशयाच्या जाहिरातींवर कोट्यवधीचा खर्च करुन तंबाखू सोडण्याचा सल्ला देत असताना याच जाहिरातीच्या विरोधात वक्तव्य करणारे खासदार दिलीप गांधी तंबाखू प्रकरणावरुन चांगलेच अडचणीत आले आहेत. या मुदद्यावर गांधींना विचारले असता, मी तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, असे म्हटले नाही. तंबाखूबरोबरच अन्य कारणांनी देखील कर्करोग होतो, असे म्हटले होते. माझ्या या वक्तव्याचा विर्पयास केला, असे शनिवारी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

तंबाखुमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सरकार जाहिरातीद्वारे जनजागृती करत अाहे. मात्र तंबाखुमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे प्रमुख भाजपचे खासदार गांधी यांनी चार दिवसांपूर्वी तंबाखुमुळे कर्करोग होतो याला पुष्टी देणारा कुठलाही अभ्यास भारतात झालेला नाही. कर्करोग केवळ तंबाखुमुळे होतो असे नाही, असे वक्तव्य केले होते. गांधी यांच्या या वक्तव्यावरुन प्रसारमाध्यमांतून टीकेची झोड उठली होती. त्यातच शुक्रवारी आढळगाव (ता. श्रीगोंदे जि. नगर) गांधी यांनी तंबाखूमुळे कर्करोग होतो हे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र अन्नपचन प्रक्रिया तंबाखुमुळे सुधारते, असे सांगून पुन्हा वादाला तोंड फोडले आहे. याबाबत गांधी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तंबाखुमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या समितीने विडी, सिगारेट, गांजा सेवन अन्य कारणांनीही कर्करोग होतो. माझ्या पहिल्या कारणांना चांगली प्रसिद्धी दिली, मात्र दुसऱ्या कारणानेही कर्करोग होतो, याला कमी प्रसिध्दी दिली. २०११ मध्ये संसदेत तंबाखुचा आरोग्यावर परिणाम होतो हा मुद्दा मीच उपस्थित केला होता, असे गांधी यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्याने सांगितले तेच मी सांगितले
आढळगावयेथे कार्यक्रमात मला एका शेतकऱ्याने मला भेटून तंबाखू घेतल्याशिवाय शौच होत नाही, असे सांगितले होते. त्याच्या या मुद्द्यावरुन मी तंबाखूमुळे पचनक्रिया सुधारते, असे वक्तव्य केले होते, असे खासदार गांधी यांनी सांगितले.