आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समानीकरणाचा वाद ठरला फुसका बार, प्रशासनाकडे अवघे बारा आक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षकांच्या समानीकरणाच्या बदल्या स्थगित करण्याच्या मागणीसाठी महत्त्वपूर्ण विषयांना फाटा देऊन मागील सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभात्यागही केला. परंतु बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याच्या अवघ्या बारा हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे समानीकरण रद्दसाठी अधिकारी विरुद्ध सदस्य यांच्यातील वाद हा फुसका बार ठरला आहे.

जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया राबवल्यानंतर शिक्षण आरोग्य वगळता इतर संवर्गातील प्रशासकीय बदल्यांबाबत फारसा वाद निर्माण झाला नाही. जिल्हा परिषदेचे राजकारण नेहमीच शिक्षण विभागातील बदल्यांभोवती फिरताना दिसते. शिक्षकांचे समानीकरणच अन्यायकारक झाल्याचा आरोप जूनला झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. बदल्या रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या सदस्यांनी बदल्या रद्द करण्याला नकार मिळाल्यानंतर सभात्याग केला. सीईओंवर अविश्वास आणण्याची तयारी सुरू झाली होती. नंतर हा वाद सामोपचाराने मिटवला, पण समानीकरण रद्द झाले नाही. सदस्यांनी ज्या शिक्षकांसाठी रान उठवले, त्या शिक्षकांनी बदल्या चुकीच्या झाल्याबाबत आक्षेप नोंदवले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत पदवीधरमधील पाच, उर्दुमधील एक, केंद्रप्रमुख दोन चार शिक्षकांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यातही फक्त दोन शिक्षकांनी अन्यायकारक बदली झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे समानीकरणासाठी मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या वादाचा फुसका बार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...