आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेमुक्त मिरवणुकीने भिंगारमध्ये श्रींना निराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगारमधील सर्वच मंडळांनी यंदाही डीजेमुक्त मिरवणूक काढून आपली आदर्श परंपरा जपली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीमध्ये एकूण १७ मंडळे सहभागी झाली होती. पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा ऑर्केस्ट्राच्या तालावर गणरायाला निरोप देण्यात आला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्तात ही मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार होता पार पडली.

दुपारी साडेबाराला ब्राह्मणगल्लीतील देशमुख गणपती मंदिरातील मानाच्या गणपतीची उत्थापन पूजा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या हस्ते झाली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक तथा शहर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक चिन्मय पंडित, सहायक निरीक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते. देशमुख परिवाराच्या वतीने शालिनी देशमुख, समीर देशमुख, अश्विन कार्तिक देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. पौरोहित्य प्रसाद कुलकर्णी अमोल कापरे यांनी केले.
उत्थापन पूजेच्या वेळी ऋषिकेश जोशी, मोरेश्वर मुळे, अनिल मुळे, शरद झोडगे, श्याम वाघस्कर, संजय सपकाळ, महेश नामदे, अवधूत देशपांडे, आर. आर. पिल्ले, सुनील लालबोंद्रे आदी उपस्थित होते. उत्थापन पूजा होताच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा गणपती पालखीत बसवून नेण्यात आला. १७ मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली. यंदाही सर्व मंडळांनी डीजेमुक्त मिरवणूक काढण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मैत्री संघष या मंडळांनी पुण्याहून ढोलताशा पथक आणले होते. मानाच्या देशमुख गणपतीच्या मिरवणुकीसमोर नगरचे रुद्रनाद ढोलपथक होते. आझाद लोहारगल्ली मंडळाचे स्वत:चे ढोल झांजपथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. आझाद मंडळाच्या गणपतीसमोर नगरचे रुद्रवंश ढोलपथक होते. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवणुकीत मोठा उत्साह होता. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यात आले. अनेक नागरिकांनी मानाच्या गणपतीची पूजा केली. विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातून जाणारी वाहतूक कॅन्टोंमेंट हॉस्पिटलमार्गे वळवण्यात आली होती.

पारंपरिक मार्गानेच विसर्जन मिरवणूक
भिंगारच्या विसर्जन मिरवणुकीला ब्राह्मणगल्लीतून सुरुवात झाली. ही मिरवणूक एमजी रोड, गवळीवाडा, सदरबाजार, दाणेगल्ली, मोमीनगल्ली, माळगल्ली, सरपणगल्ली या नेहमीच्याच मार्गाने शुक्लेश्वर मंदिराजवळ नेण्यात आली. तेथील बारवेत रात्री उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक मार्गावर संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
मानाच्या देशमुख गणपतीची पालखी नेताना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी. समवेत समीर देशमुख, अश्विन देशमुख, कार्तिक देशमुख,संजय सपकाळ, आदी.
रुद्रनाद ढोलपथकातील मुलींनी असा ताल धरला होता.

कडेकोट बंदोस्तात निरोप
ईदसाठी नेमलेला बंदोबस्त सायंकाळनंतर भिंगारमध्ये तैनात करण्यात आला. अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक, निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक उपनिरीक्षक, २०० पोलिस, एसआरपी प्लाटून, आरसीपी प्लाटून २५ महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मिरवणुकीसाठी होता.
बातम्या आणखी आहेत...