आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिना होऊनही सापडेना ‘ती’ मुलगी, पोलिस म्हणतात तपास चालू, कुटुंब धास्तावलेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लग्नलावून देण्यास नकार दिला म्हणून गुंडांच्या मदतीने एका युवकाने मामाच्या अल्पवयीन मुलीचे सिनेस्टाईल अपहरण केले. याप्रकरणी गुन्हा नोंदवून महिना उलटला, तरीही अद्याप पोलिसांना अपहृत मुलगी तिचे अपहरण करणारा सापडायला तयार नाही. दुसरीकडे आरोपीचे नातेवाईक धमकावत असल्यामुळे पीडित मुलीचे कुटुंब धास्तावले आहे. मुलीचा शोध लागत नसल्यानेे तिचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.

श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील एका शेतकरी कुटुंबाची ही व्यथा आहे. या शेतकऱ्याला तीन मुली आहेत. सर्वात मोठी १७ वर्षांची, दुसरी १४, तर तिसरी ११ वर्षांची आहे. त्यांची बहीण त्याच गावात राहते. तिला दोन मुले आहेत. त्यापैकी एकाचे लग्न झाले असून दुसऱ्यासाठी बहिणीने भावाच्या मोठ्या मुलीला मागणी घातली होती. पण मुलगा ड्रायव्हर व्यसनी असल्याने शेतकरी कुटुंबाने या लग्नाला नकार दिला. हा नकार पचवता आल्यामुळे मुलाने २५ जूनला सकाळी काही गुंडांच्या मदतीने मामाच्या दोन मुलीचे सिनेस्टाईल अपहरण केले.

हा प्रकार तिच्याबरोबर शाळेत निघालेल्या लहान मुलीने पाहिला घरी येऊन पालकांना सांगितला. पालकांनी मुलीचा दोन दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर युवकासह त्याच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तिघा जणांिवरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पण अपहरण करणारा युवक अपहृत युवती पोलिसांना सापडलेले नाहीत. हे वृत्त काही वर्तमानपत्रांमध्ये आल्यानंतर आरोपीच्या भावाने स्थानिक वार्ताहरांना फोनवरून धमकी दिली. बातम्यांमुळे पोलिसांवर दबाव येत आहे, असे म्हणत या प्रकरणात लक्ष घातले, तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी त्याने दिली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनाही तो फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचे मुलीच्या पालकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले आहे. ही बाब शिवसेना महिला आघाडीला समजल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

तपास चालू आहे
शिवसेनामहिला अाघाडीच्या पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी मुलीच्या पालकांसमवेत पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यंाची भेट घेतली. एक महिना होत आला, तरी मुलगी सापडत नसल्यामुळे या गुन्ह्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, अशी विनंती त्यांनी केली. त्रिपाठी यांनी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून गुन्ह्याची माहिती घेतली. तपास चालू असून तपासात सहकार्य करा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच मुलीच्या पालकांना उपोषण करण्यापासून परावृत्त केले. आठ दिवसांत आरोपींचा शोध लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

किती वाट पहायची?
आमच्यातिन्ही मुली अल्पवयीन असून आरोपी व्यसनी असल्यामुळे त्याच्याशी लग्न लावून देण्याची आमची मानसिकता नाही. अद्याप मुलीचा थांगपत्ता लागलेला नाही. जिल्ह्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना कानावर येत आहेत. आरोपीचे कुटुंबीय धमकावत आहेत. आमची मुलगी सापडायला तयार नाही. आणखी किती दिवस वाट पहायची. या प्रकारामुळे इतर दोन मुलींचे शिक्षणही बंद झाले आहे. पोलिस बघ्याची भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा? अशी आर्त व्यथा संबंधित पीडित मुलीच्या आईने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली आहे.

...तर शिवसेना रस्त्यावर उतरेल
मांडवगण येथीलअल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे वर्तमानपत्रात वाचल्यानंतर शिवसेना महिला आघाडीने मुलीच्या कुटुंबीयांना भेटून माहिती घेतली. एक महिना होत आला, तरी मुलगी सापडत नाही. आरोपी युवकही फरार आहे. स्थानिक पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आम्ही भेटलो. लवकरात लवकर मुलीची सुटका करण्याचे आवाहन त्यांना केले. पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांनी आठ दिवसांची मुदत आम्हाला दिली. आता पाच-सहा दिवस होत आले, तरीही तपासात प्रगती नाही. आठ दिवसांत मुलीचा शोध लागला नाही, तर शिवसेना महिला आघाडी पीडित कुटुंबीयांसोबत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल.'' आशािनंबाळकर, शिवसेना महिला आघाडी.
बातम्या आणखी आहेत...