आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Pressure From Nationalist , Still Monday Confusation Clear : Chief Minister Prithiviraj Chavan

राष्ट्रवादीकडून दबाव नाही, सोमवारपर्यंत कोंडी फुटेल : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या मुद्दय़ावरून विरोधकांनी रोखलेले विधानसभेचे कामकाज सोमवारपासून सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नगर जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. सभागृहात दिलगिरी व्यक्त न करण्यासाठी राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही एकत्रितपणे निर्णय घेत असतो.