आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Rain In Nagar From Last One Month Scholl Children Pray For Rain

यावे भरून अवघे आभाळ आणि कोसळावा पाऊस भरभरून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरकरांची गेल्या महिनाभरापासूनची पावसाची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. जुलै महिना उजाडला, तरी पावसाने फिरवलेली पाठ सर्वांच्याच चिंतेत भर टाकत आहे. या पार्श्वभूमीवर विश्रामबाग येथील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना आळवत वरुणराजाला भरभरून बरसण्याचे साकडे घातले.

पाऊस लांबल्याचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागले आहेत. पाणीटंचाईचे संकट ओढवले असून खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. भाजीपाल्यांचे भाव वधारल्याने महागाईचे चटके तीव्र झाले आहेत. माणसांबरोबरच पशू-पक्ष्यांनाही पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरातील नागरिकांनाही पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची वेळ आली आहे.

तापलेल्या धरणीची तहान भागावी, टंचाईचे संकट टळावे यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पावसाला आर्त साद घातली. मुख्याध्यापिका संध्या मकाशीर, शिक्षक विजय कदम, गणेश बुरा, जितेंद्र निकम, द्वारकादास देशमुख, संगीता भंडारी, मंजुषा जोशी, अनिता वाळके, लीना डोंगरदिवे यांनी हा उपक्रम राबवला. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, सुरेश भालेराव, शरद रच्चा यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.
मुलांनी घातली पावसाला साद...
सूर्य तेजाचा महिना
आग सरला रे देवा
यावे भरून आभाळ
आणि मेघ कोसळावा
झाली घायाळ धरित्री
तप्त किरणे झेलून
जल शिंपडावे आता
सृष्टी येईल फुलून
सारे सजीव पहाती
आता वाट पावसाची
फौज येऊ दे नभात
काळ्या काळ्या ढगांची...

फोटो - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विश्रामबाग येथील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना करत पावसाला आर्त साद घातली. छाया : सचिन शिंदे