आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे आहेर स्वकियांकडूनच अडचणीत येण्याची शक्यता..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या सभा संगमनेरमध्ये होणार नसल्याचे स्पष्ट होताच शिवसैनिकांचे अवसान गळाले. त्यामुळे कात्रीत सापडलेल्या शिवसेनेवर आता दुसरे संकट ओढवले आहे. स्वत: उमेदवार रुग्णालयात, ‘चमको’ पदाधिकारी गायब आणि कार्यकर्ते सैरभैर, अशी अवस्था सध्या शिवसेनेची झाली.

शिवसेनेचे संगमनेरचे उमेदवार जर्नादन आहेर चार दिवसांपासून आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. तसेच शिवसेनेच्या उमेदवाराला सध्या पक्षातील काही चमकोंमुळे अंतर्गत कलहानेही ग्रासले आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या सभांशिवाय किल्ला लढवण्याची जबाबदारी उमेदवारावर आली आहे. शिवसेनेचे काही चमको पदाधिकारीच आहेर यांचे मताधिक्य कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शहरप्रमुख अमर कतारी विधानसभेसाठी उद्योजक साहेबराव नवले यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच ते शहरात प्रचारात सक्रीय झाले. तर अनेक आजी माजी पदाधिकारी प्रचार यंत्रणेतून गायब झाले आहेत. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे प्रचार शुभारंभानंतर प्रचारात दिसले नाहीत.
लोखंडेंनी फिरवली पाठ
लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीत काम करणाऱ्या आहेर यांनी उघडपणे खासदार सदाशिव लोखंडे यांना मदत करत पालकमंत्री मधुकर पिचड यांचा रोष आेढावून घेतला होता. आहेर यांनी त्यांच्या वर्चस्वाखालील जिल्हा परिषदेच्या गटातून लोखंडे यांना मताधिक्य दिले. आहेर यांच्या उमेदवारीसाठी लोखंडे यांनी प्रयत्न केले. मात्र, आहेर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी लोखंडेही अद्याप मतदारसंघात फिरकले नाहीत.