आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्यांना अजून वेग नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. सोमवार अखेरपर्यंत खरिपाच्या लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. दरम्यान, रविवारी सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग येईल, अशी आशा आहे.

नगर जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये हजार ५९९ गावे असून, त्यात खरिपाची ५८१ गावे आहेत. ऊस वगळता खरिपाचे एकूण क्षेत्र लाख १२ हजार हेक्टर आहे. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ७६.८३ टक्के पाऊस झाल्याने लाख ८७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. कमी पावसामुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर गेल्या वर्षी पेरणी झाली नाही. यंदा मात्र जूनपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. आता मान्सूनचा पाऊस सर्वत्र दाखल झाला असला, तरी तो सर्वदूर सारखा नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या.

११ जूनपासून सलग पाच दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरला. रविवारी (२१ जून) जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. सोमवारीही पाऊस सुरूच होता. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असला, तरी तो मोठ्या प्रमाणात नसेल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे जामखेड तालुक्यात पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत केवळ हजार ६६८ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा हजार ६०० हेक्टरवर पेर झाली आहे.नेप्ती शिवारातील काही भागात पेरण्या झाल्या आहेत. तथापि, हे प्रमाण कमी आहे.

पावसामुळे पेरण्यांना आता वेग येईल
यंदाच्याखरीप हंगामासाठी कृषी विभागाने लाख ८३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पेरण्या प्रगतिपथावर आहेत. मूग, डाळ, उडीद बाजरीच्या पेरण्यांना वेग येत आहे. पेरणीयोग्य पोषक पाऊस होत आहे. अंकुश माने, कृषी अधीक्षक अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...