आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Water Supply On Saturday To Nagar's Some Parts

नगरच्या काही भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महावितरणकडून शनिवारी (9 मार्च) सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात महापालिकेतर्फे शहर पाणीपुरवठा योजनेच्या वाहिन्यांची उन्हाळ्यापूर्वी आवश्यक असलेली दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या वेळेत मुळानगर व विळद येथून होणारा पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार असल्याने टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाइपलाइन रस्ता, गुलमोहर रस्ता, तसेच स्टेशन रस्ता, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.