आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not A Singal Petrol, Diseal Tanker Allowe, Raghunathdada Patil Warn Centre

देशात पेट्रोल, डिझेलचा एकही टँकर फिरू देणार नाही , रघुनाथदादा पाटील यांचा केंद्राला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ब्राझीलमध्ये 1920 पासून पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. भारतात मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. सौमित्र समितीने पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याची सूचना केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास देशभरात एकही पेट्रोल, डिझेलचा टँकर फिरू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केंद्र सरकारला दिला. सोमवारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांना आलेल्या धमक्यांबाबत त्यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पाटील म्हणाले, लीकर लॉबीचा सरकारवर दबाव असल्यामुळे हा निर्णय लागू केला जात नाही. याची अंमलबजावणी झाली, तर कोरडवाहू शेतक-यांना त्याचा फायदा होईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबवायची असेल, तर या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित केली पाहिजे. हा निर्णय घेतला नाही, तर सोने गहाण ठेवून सरकारला देश चालवावा लागेल. सर्व शेतमालावरची निर्यातबंदी केंद्र सरकारने त्वरित उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. रंगराजन समितीने साखर उद्योगासाठी लेव्ही रद्द करावी, कारखान्यांची कोटा पद्धत रद्द करावी यासह अनेक शिफारशी केल्या आहेत. परंतु त्या सरकार मानायला तयार नाही, असे ते म्हणाले.


मुंडेंनी 80 कोटींची लूट केली
गोपीनाथ मुंडेंनी वैद्यनाथमार्फत के. के. वाघ सहकारी साखर कारखाना (तालुका निफाड), संत एकनाथ साखर कारखाना (पैठण), केदारेश्वर साखर कारखाना (पाथर्डी) हे कारखाने भाडेतत्त्वावर घेतले. वैद्यनाथ कारखान्यातील उसाला 2010-11 मध्ये 1800 व 2011-12 मध्ये 1,900 भाव दिला. पण इतर कारखान्यांनी मात्र 2010-11 मध्ये 1400, 2011-12 मध्ये 1600 रुपये भाव दिला. दोन वर्षांत या कारखान्यांचे गाळप 9 लाख टन झाले. मुंडेंनी या कारखान्यातील उसाला 400 रुपये कमी भाव देऊन शेतक-यांची 80 कोटींची लूट केली. मुंडेंना मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढता आला नााही, असा आरोप पाटील यांनी केला.