आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Bring Politics In Development : Mayor Shinde

विकासकामांत राजकारण आणू नका : महापौर शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विकासकामे सुरू आहेत. राजकारणाच्या वेळी राजकारण करा, पण विकासकामे करताना राजकारण आणू नका, असे आवाहन महापौर शीला शिंदे यांनी केले.

प्रभाग 48 मधील पटेलवाडी येथे जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होते. अमृत शहा, पंकज पटेल, प्रफुल्ल पटेल, भारती शहा, सविता पटेल, डिंपल शहा, गंगा पटेल, कस्तुर पटेल आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाल्या, नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. उपनगरांत मोठी वाढ झाली असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कोणी राजकारण आणू नये.

महापालिकेची आर्थिक स्थिती सर्वांना माहिती असून यातून मार्ग काढत विकासासाठी समान निधी दिला जात आहे. मात्र, परिस्थितीची जाणीव न ठेवता विरोधक नाहक पत्रकबाजी करत असल्याची टीका महापौर शिंदे यांनी सावेडीतील समतानगर येथील त्रिमूर्ती मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा प्रारंभ करतानाही केली. विकासकामात सहकार्य न करणार्‍यांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नगरसेविका इंदरकौर गंभीर, निखिल वारे, संगीता खरमाळे, अजिंक्य बोरकर, सुशील थोरात, रवींद्र शितोळे, रा. द. हिरे, दादासाहेब जाधव, विजय मगर आदी यावेळी उपस्थित होते. कोणताही दुजाभाव न करता शहरात अनेक प्रकारची कामे सुरू आहेत. सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे शिंदे यांनी सांगितले.